AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narendra Modi: मोदी यांचा कॅप्टन स्मिथ मछारशी थेट संवाद, फोनवरुन केली विचारपूस, पायलट म्हणाला, हनुमान चालिसा..

Narendra Modi To Smit Machchchar: स्मिथ माछरच्या शौर्याचे सर्व जगाला कौतुक आहे. स्वत:वर हल्ला होत असताना शेकडो प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या स्मिथवर सध्या उपचार सुरु आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मिथला फोन केला होता.

Narendra Modi: मोदी यांचा कॅप्टन स्मिथ मछारशी थेट संवाद, फोनवरुन केली विचारपूस, पायलट म्हणाला, हनुमान चालिसा..
| Updated on: Oct 02, 2026 | 12:28 PM
Share

PM Narendra Modi: कॅप्टन स्मित मछार दुबईहून तेल अवीवला जाणारे फ्लायदुबईचे विमान FZ1073 चालवत होते. उड्डाणादरम्यान, त्यांच्या सह-वैमानिकाने हल्ला करण्यास सुरुवात केली. विमान अचानक आपल्या नेहमीच्या उंचीवरून हजारो फूट खाली कोसळू लागले पण या वैमानिकाने अजिबात या विमानानरील ताबा सोडला नाही. ते विमान सौदा अरेबियाला तात्काळ उतरवण्यात आले आणि आता भारतीय वैमानिक स्मिथ मछारवर उपचार सुरु आहे. आता त्यांची प्रकृती कशी आहे याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच फ्लायदुबई घटनेत जखमी झालेले भारतीय पायलट कॅप्टन स्मित माछर यांच्याशी फोनवर संवाद साधला. मोदी म्हणाले की, जेव्हा तु जीवन आणि मृत्यूची लढाई लढत होतास तेव्हाही तू तुझा विचार केला नाहीस, सर्वात खास गोष्य म्हणजे १४० कोटी लोकांचा मान तुम्ही वाढवलात आणि म्हणून मी अगदी मनापासून तुमचा गौरव करतोय. मी काल भूपेंद्र भाॉईसोबत, गीताबेनसोबत, आणि सोनल बेनशी बोललो. मी गीताबेनला बोललो की तुमचे नाव गीता आहे पण तुम्ही कृष्णाच्या गीताला पूर्णपणे न्याय दिलात, आणि तुम्ही स्मितला तुम्ही सााक्षात गीतातील संस्कार दिलात. ” यानंतर स्मितने त्याचा अनुभव सांगितला.

कॅप्टन माछर म्हणाले की, सर तुम्ही माझा आदर्श आहात, एका क्षणासाठी मी विचार केला की मला लढावं लागेल. त्या कठीण काळात हनुमान चालिसेने धैर्य दिले. मी नियमितपणे हनुमान चालिसेचे पठण करतो, ज्यामुळे मला आत्मविश्वास मिळतो. जणू काही हनुमानाने आमचे आणि विमानातील सर्वांचे रक्षण केले,” विमानात अचानक आलेल्या संकटातही त्यांनी परिस्थिती कशी हाताळली तेही सांगितले. बुधवारी फ्लाय-दुबई विमानात सह-पायलटसोबत झालेल्या झटापटीत कॅप्टन माछार गंभीर जखमी झाले होते. असे असूनही, त्यांनी कॉकपिटचा दरवाजा उघडला, ज्यामुळे नंतर क्रू आणि प्रवाशांना परिस्थिती हाताळण्यास मदत झाली.”

संभाषणादरम्यान, पंतप्रधान मोदींनीही कॅप्टन मच्छर यांच्या धैर्याची प्रशंसा केली. पंतप्रधानांनी यापूर्वी त्यांच्या पत्नी आणि आई-वडिलांशी फोनवर संवाद साधला होता. त्यांनी कुटुंबाला सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. पंतप्रधानांनी कॅप्टन माछर यांना राष्ट्रीय नायक संबोधून त्यांच्या धैर्याची जाहीरपणे प्रशंसाही केली.

Follow Us
सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत..
Sachin Kharat : सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत केला गंभीर दावा, पुढे म्हणाले...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं
Delhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं, पोलिसांकडून आंदोलकांना...
शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत
Mumbai : शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत....
पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या
Diveagar Beach Raigad : पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या समुद्रात 8 मुलांचा दुर्दैवी अंत
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा मीनाक्षी शिंदेंवर थेट निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका....
Delhi Protest : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका, इंटरनेट सेवा बंद
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...