AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WITT Summit 2026 : मी आयुष्याकडे नेहमीच… स्मृती इराणींनी सांगितला यशस्वी होण्याचा मंत्र

टीव्ही ९ नेटवर्कच्या WITT समिटमध्ये स्मृती इराणी यांनी राहुल गांधींच्या प्रतिमेवर भाष्य केले, तर बाबा रामदेव यांनी त्यांच्या ऊर्जेचे आणि योगाचे रहस्य उलगडले. वाचा सविस्तर.

WITT Summit 2026 : मी आयुष्याकडे नेहमीच... स्मृती इराणींनी सांगितला यशस्वी होण्याचा मंत्र
Smriti Irani
| Updated on: Mar 24, 2026 | 10:47 AM
Share

टीव्ही ९ नेटवर्कच्या यंदाच्या प्रतिष्ठित व्हॉट इंडिया थिंक्स टुडे (WITT) समिटचे आयोजन करण्यात आले आहे. या समिटच्या निमित्ताने आज दुसऱ्या दिवशी सत्ता संमेलन आयोजित करण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. आज या व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि योगगुरू बाबा रामदेव यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर आपली मते मांडली. यावेळी स्मृती इराणी यांनी आपल्या राजकीय प्रवासावर भाष्य करत विरोधकांच्या टीकेलाही चोख प्रत्युत्तर दिले. तर बाबा रामदेव यांनी त्यांच्या उत्साहाचे आणि ऊर्जेचे रहस्य उलगडले.

या समिटमध्ये स्मृती इराणी यांनी कारण स्मृती कधीही हार मानत नाही या सत्रात त्यांनी मनमोकळेपणाने संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांच्या राजकीय आयुष्याबद्दल भाष्य केले. तसेच त्यांच्या जगण्याचा मंत्रही सांगितला. मी आयुष्याकडे नेहमीच एक संधी म्हणून पाहिले आहे. मला निर्णय घेताना कधीही भीती वाटली नाही, कारण भीती माणसाला मर्यादित करते. मला स्वतःला कायम एका नव्या साच्यात पाहायला आवडते. त्यामुळेच मी बदलांना नेहमीच स्वीकारले आहे, असे स्मृती इराणी म्हणाल्या.

यावेळी स्मृती इराणी यांनी नातेसंबंधांमधील बदलांवर भाष्य केले. मी काळाप्रमाणे नातेसंबंधांचे स्वरूपही बदलते आणि त्यांना नवीन आकार देत असते. हे जीवनाचे एक स्वाभाविक चक्र आहे, असे स्मृती इराणी यांनी म्हटले.

दुसऱ्या पक्षाला जबाबदार धरता कामा नये

भाजपकडून राहुल गांधींची प्रतिमा सतत डागाळण्याचा प्रयत्न का केला जातो? या प्रश्नावर स्मृती इराणी यांनी अत्यंत सावध आणि स्पष्ट भूमिका मांडली. त्या म्हणाल्या, “कोणत्याही विरोधी पक्षनेत्याच्या प्रतिमेसाठी दुसऱ्या पक्षाला जबाबदार धरता कामा नये. ते दीर्घकाळापासून राजकारणात आहेत आणि जनता त्यांना चांगल्या प्रकारे ओळखते. कोणताही एक राजकीय पक्ष कोणाचीही प्रतिमा बनवू किंवा बिघडवू शकत नाही, असे स्मृती इराणी यांनी सांगितले.

कडाक्याच्या थंडीतही मी योगा करतो

यावेळी योगगुरू बाबा रामदेव यांनी त्यांच्या उर्जेचे कारणही सांगितले. तुम्हाला आणि राहुल गांधींना थंडी का वाजत नाही?” या प्रश्नावर उत्तर देताना बाबा रामदेव म्हणाले, मला माझे आतले हीटर कसे सुरु हे चांगले ठाऊक आहे. अगदी कडाक्याच्या थंडीतही मी योगा करतो. त्यामुळे अगदी ५ मिनिटात घाम कसा काढायचा हे मला चांगलंच ठाऊक आहे. त्यामुळे जेव्हा मनातून आनंद असतो, तेव्हा कशाचीही काळजी उरत नाही, असे बाबा रामदेव यांनी सांगितले.

माझे संपूर्ण आयुष्य एक उघड पुस्तक

मला थंडी वाजत नाही. मला काहीही मिळवण्याची ओढ नाही आणि गमावण्याची भीती नाही. मी चहा, कॉफी किंवा शीतपेये घेत नाही, जिममध्ये जात नाही की परदेशात फिरायला जात नाही. माझे कोणतेही गुप्त संबंध किंवा अजेंडा नाही. माझे संपूर्ण आयुष्य एक उघड पुस्तक आहे, असे बाबा रामदेव यांनी ठामपणे सांगितले. या सत्रात बाबा रामदेव यांनी आरोग्य आणि योगासोबतच मध्य-पूर्वेतील संघर्ष, जागतिक राजकारण आणि भारताच्या विकास प्रवासावरही महत्वपूर्ण भाष्य केले.

Follow Us
सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
Lalbugcha Raja Visarjan : सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम,
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम, अमृता फडणवीसांचा निर्धार
कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे...
Lalbaugcha Raja Visarjan video : कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे विसर्जन
राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात...
Lalbaugcha Raja Visarjan LIVE: राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात जाणार
थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
Lalbaugcha Raja Visarjan | थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
Anant Ambani : लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीला निरोप; गिरगाव चौपाटीवर...
ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीला निरोप; गिरगाव चौपाटीवर भाविकांची गर्दी
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाला निरोप
Mumbai Ganpati Visarjan | गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाला निरोप
20 तासांपासून लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू; आणखी विलंब होण्याची...
20 तासांपासून लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू... आणखी विलंब होण्याची शक्यता, नेमकं कारण समोर
गणेशोत्सव आणि विसर्जनाबाबत अमृता फडणीसांचं मोठं विधान
आजच्या मोहिमेत जवळपास 3 हजार... गणेशोत्सव आणि विसर्जनाबाबत अमृता फडणीसांचं मोठं विधान