AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाऊ मरू नये म्हणून भावाला 150 थपडा मारल्या; हैराण करणारी गोष्ट

छोट्या भावाचा जीव वाचवण्यासाठी मोठा भाऊ त्याला 150 थपडा मारत राहिला. उत्तर प्रदेशमधल्या हरदोईल इथं ही हैराण करणारी घटना घडली आहे. नेमकं काय घडलं, ते सविस्तर वाचा..

भाऊ मरू नये म्हणून भावाला 150 थपडा मारल्या; हैराण करणारी गोष्ट
तरुणाला सर्पदंश, जीव वाचवण्यासाठी भावाने काय केलं?Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 16, 2026 | 12:18 PM
Share

छोट्या भावाचा जीव वाचवण्यासाठी मोठ्या भावाने त्याला चक्क 150 हून अधिक थपडा मारल्या. उत्तरप्रदेशमधल्या हरदोई इथली ही घटना आहे. शेतात काम करताना भावाला सापाने दंश केला. त्याचे प्राण वाचवण्यासाठी मोठ्या भावाने रस्त्यावर मदतीसाठी विनवणी केली. तेव्हा बाईकवरून जाणारा एक व्यक्ती देवासारखा मदतीला धावून आला आणि त्या दोघांना रुग्णालयात पोहोचण्यास मदत केली. मात्र तोपर्यंत सापाचं विष त्याच्या शरीरात हळूहळू पसरत गेलं आणि त्याची अवस्था अत्यंत गंभीर झाली होती. रुग्णाला पाहून डॉक्टरांनी त्याला कोणत्याही परिस्थितीत झोपू देऊ नका, असं सांगितलं. तेव्हा मोठा भाऊ त्याच्या गालावर थपडा मारत राहिला. 150 हून अधिक वेळा थपडा मारत त्याला जवळपास तासभर जागं ठेवल्यानंतर डॉक्टरांनी 15 इंजेक्शन्स देऊन त्याचा जीव वाचवला. ही घटना शनिवारी दुपारी हरदोईमधल्या ग्रामीण कोतवाली परिसरात घडली.

नेमकं काय घडलं?

हरदोईमधल्या ज्योती नगर परिसरात गुड्डू हे त्यांची पत्नी आणि तीन मुलांसोबत राहतात. अरुण आणि आकाश अशी त्यांच्या मुलांची नावं असून त्यांना संजना नावाची एक मुलगीसुद्धा आहे. गुड्डू यांचा मोठा मुलगा आकाश डेअरी चालवतो. शनिवारी तो शेतात काम करत होता. दुपारी दोन वाजताच्या सुमारास अरुण त्याचा भाऊ आकाशसाठी शेतात पाणी घेऊन गेला होता. भावाला मदत व्हावी म्हणून तो शेतात काम करू लागला. अरुणने जेव्हा गवताची एक पेंड उचलली तेव्हा त्यात लपलेल्या सापाने त्याला दंश केला. सापाने दंश करताना अरुण किंचाळला. भावाचा ओरडण्याचा आवाज ऐकून आकाश धावत त्याच्याकडे गेला आणि सर्पदंशाची खूण पाहून त्याने तातडीने रुग्णवाहिका आणि पोलिसांना बोलावण्याचा प्रयत्न केला.

डॉक्टरांची सक्त ताकीद

सर्पदंशाने अरुणची प्रकृती अधिकच बिघडत चालली होती. अखेर रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीने अरुणची गंभीर अवस्था पाहून दोघा भावंडांना आपल्या बाईकवरून तातडीने मेडिकल कॉलेजमध्ये नेलं. मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचल्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ. शेर सिंह आणि त्यांच्या पाच सदस्यीय पथकाने तात्काळ उपचार सुरू केले. रुग्णाला कोणत्याही परिस्थितीत झोपू देऊ नका, अशी सक्त ताकीद डॉक्टरांनी आकाशला दिली होती. तेव्हा भावाला जागं ठेवण्यासाठी आकाश त्याच्या गालावर थपडा मारत राहिला. आकाशने अरुणला जवळपास 150 हून अधिक वेळा थपडा मारल्या. तर रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांनीही त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी डॉक्टर म्हणाले, “सर्वसामान्यपणे सर्पदंशाच्या प्रकरणाच पाच इंजेक्शन्स दिली जातात, पण अरुणला 15 इंजेक्शन्स द्यावे लागले. कारण अरुणच्या शरीरात विष पसरलं होतं. त्याला दोन तासांत एकूण 15 अँटी वेनम इंजेक्शन्स देण्यात आली. सर्पदंशानंतर झोप लागणं हे प्राणघातक ठरू शकतं. कारण त्यामुळे नर्व्हस सिस्टीम मंदावू शकते आणि उल्टी श्वासनलिकेत अडकण्याचा धोका असतो.” सुदैवाने अरुणची प्रकृती आता स्थिर असून डॉक्टरांची टीम त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...