AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सापांच्या प्रजनन हंगामाला सुरुवात, या झाडापासून जरा दूरच राहा, सापांची अंडे देण्याची सर्वात आवडती जागा

पावसाळ्याच्या काळात साप हे अधिक सक्रिय असतात. पावसाळा हा त्यांच्या प्रजननाचा काळ असतो. त्यामुळे ते अधिक आक्रमक बनतात. पावसाळ्यात साप बिळामध्ये राहत नाही, त्यांचा जमिनीवर मुक्त वावर असतो. काही वनस्पती या अशा असतात, ज्या आपल्या नैसर्गिक रचनेमुळे सापांना आपल्याकडे आकर्षित करतात.

सापांच्या प्रजनन हंगामाला सुरुवात, या झाडापासून जरा दूरच राहा, सापांची अंडे देण्याची सर्वात आवडती जागा
snake
| Updated on: Sep 24, 2026 | 7:50 PM
Share

आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात सापांबद्दल एक वेगळंच कुतुहलच असतं, तसेच भीती देखील असते. आपल्या मनात लहानपणापासून एक गैरसमज हा घट्ट चिकटून बसलेला असतो, तो म्हणजे प्रत्येक साप हा विषारीच असतो. त्यामुळे आपण अनेकदा गैरसमजामधून सापांना मारतो. यामुळे दिवसेंदिवस सापांची संख्या कमी होत चालली आहे. सापांची संख्या कमी झाल्यामुळे घुशी सारख्या प्राण्यांच्या संख्येत वाढ होत आहे. सापांना शेतकऱ्यांचा मित्र देखील म्हटलं जातं. त्यामुळे तुम्हाला तुमच्या घराचं गार्डन किंवा कुठेही साप दिसला तर त्याला मारू नका, त्याची माहिती तुम्ही तुमच्या परिसरातील सर्पमित्रांना देऊ शकतात. ते या सापांना पकडून सुरक्षित जागी रेस्क्यू करतील. तसेच तुम्हाला कुठेही साप आढळला तर त्याला पकडण्याचा प्रयत्न करू नका, कारण असं करणं हे चुकीचं आहे. त्या सापाबद्दल म्हणजे तो विषारी आहे की बिनविषारी असं आपल्याला काहीच माहिती नसतं.

भारतामध्ये सापांच्या हजारो प्रजाती आढळून येतात, परंतु त्यामध्ये केवळ हाताच्या बोटावर मोज्याइतक्याच प्रजाती या विषारी आहेत. ज्यामध्ये मण्यार, फुरसे, घोणस, आणि नाग, ज्याला आपण कोबरा असं देखील म्हणतो. या प्रमुख चार विषारी जाती आहे. यांना भारतात बिग फोर असं देखील म्हटलं जातं. विशेष म्हणजे या चारही विषारी प्रजाती महाराष्ट्रात आढळून येतात.  जर तुम्हाला कुठेही साप दिसला तर घाबरून न जाता त्याची माहिती सर्पमित्रांना द्यावी.

दरम्यान असे काही झाडं आणि वनस्पती असतात ज्या सापांना आपल्या विशिष्ट नैसर्गिक गुणधर्मामुळे आकर्षित करतात. अनेकदा अशा झाडांखाली तर काही वेळेला झाडांवर सुद्धा सापांचा वावर दिसून येतो. यातीलच एक झाड आहे ते म्हणजे चंदनाचं झाडं. अनेकदा साप या झाडाच्या आसपास आढळून येतात त्याचं मुख्य कारण म्हणजे चंदनाच्या झाडाला बारीक फळं असतात, हे फळं पक्ष्यांना खूप आवडतात. या झाडावर कायम पक्ष्यांचा वावर असतो, त्यामुळे सापांना सहज शिकार उपलब्ध होते, पक्ष्याची अंडी खायला मिळतात. त्यामुळे इथे साप आढळून येतात. तसेच अनेकदा साप या झाडाखाली अंडी देखील घालतात.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा