नाग मारल्यानंतर नागिणीनं जे केलं ते पाहून अख्खं गाव थरथर कापलं, बदल्यासाठी 15 दिवसांनी आली अन्…

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, एक नागीण आपल्या साथिदाराच्या मृत्यूनंतर बरोबर 15 दिवसांनी पुन्हा त्याच गावात आली, त्यानंतर ग्रामस्थांसोबत धक्कादायक घटना घडली आहे.

नाग मारल्यानंतर नागिणीनं जे केलं ते पाहून अख्खं गाव थरथर कापलं, बदल्यासाठी 15 दिवसांनी आली अन्...
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 01, 2025 | 10:58 PM

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, एक नागीण आपल्या साथिदाराच्या मृत्यूनंतर बरोबर 15 दिवसांनी पुन्हा त्याच गावात आली. उत्तर प्रदेशमधील एटा गावात हा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. ग्रामस्थांनी केलेल्या दाव्यानुसार ही नागीण या गावात आपल्या जोडिदाराच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आली होती. या नागिणीला गावात पाहाताच ग्रामस्थ प्रचंड घाबरले. समोर आलेल्या माहितीनुसार ही नागीण तब्बल दोन तास एकाच जागेवर हल्ल्याच्या पवित्र्यात फुत्कारत बसली होती. ग्रामस्थांनी याची माहिती वन विभागाला दिली, माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या नागिणीला रेस्क्यू केलं.

नागाला मारल्यानंतर नागीण त्यांच्या मृत्यूचा बदला घेते किंवा नागिणीला मारल्यानंतर नाग तिच्या मृत्यूचा बदला घेतो, अशा प्रकारच्या कथा तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील. मात्र असं खरंच होऊ शकतं का? विज्ञान काय सांगतं? या संदर्भातील एक प्राचीन कथा प्रसिद्ध आहे, जर तुम्ही नाग आणि नागिणीच्या जोडीमधील एकाला मारलं तर त्याचा दुसरा जोडिदार आपल्या जोडिदाराचा बदला घेतो, असा दावा देखील केला जातो की नागीण आपल्या जोडिदाराला ज्याने मारलं त्याचा चेहरा लक्षात ठेवते आणि नंतर त्याचा बदला घेते? पण हे खरं आहे का? असं खरंच होऊ शकतं का? याबद्दल जाणून घेऊयात.

एटामध्ये घडलेली ही घटना सध्या चर्चेचा विषय आहे, मात्र वैज्ञानिक दृष्टीकोणातून नाग किंवा नागीण अशा प्रकारे बदला घेणं कधीच शक्य नाही. पहिली गोष्ट म्हणजे साप कधीच जोडी बनवून राहात नाहीत, ते फक्त प्रजनन काळातच एकत्र येतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सापाची बुद्धी ही खूप अल्प असते, सापाचा मेंदू हा खूप छोटा असतो, त्यामुळे ते कुठलीच गोष्ट लक्षात ठेवू शकत नाहीत, त्यामुळे अशा प्रकारे साप कधीही बदला घेऊ शकत नाहीत.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)