दिवसा होणार अंधार, 6 मिनिट 22 सेकंद जग अंधारात, सर्वात मोठं सूर्यग्रहण, तब्बल 100 वर्षाने..

Solar Eclipse : ग्रहणाचा कालावधी फार जास्त महत्वाचा असतो. विविध संशोधन यादरम्यान केली जातात. सर्वात जास्त सूर्यग्रहणाला महत्व आहे. यादरम्यान सूर्याच्या आसपास अनेक बदल होताना स्पष्ट दिसतात.

दिवसा होणार अंधार, 6 मिनिट 22 सेकंद जग अंधारात, सर्वात मोठं सूर्यग्रहण, तब्बल 100 वर्षाने..
Solar Eclipse india
| Updated on: Nov 08, 2025 | 3:27 PM

ग्रहणाच्या कालावधीत अनेक बदल होत असतात. खगोलीय दृष्टा ग्रहणाचा कालावधी खूप जास्त महत्वाचा ठरतो. विविध संशोधन यादरम्यान केली जातात. सर्वात जास्त सूर्यग्रहणाला महत्व आहे. दिवसा पृथ्वीमध्ये आपल्याला मोठे बदल होताना दिसतात. सूर्यमालेतील ग्रहण ही खगोलीय घटना आहे, ग्रहणाचा प्रभाव दीर्घकाळ टिकतो. 100 वर्षातील सर्वात मोठे सूर्यग्रहण लवकरच दिसणार आहे. विशेष म्हणजे यादरम्यान दिवसा काही वेळ अंधार राहिल. या ग्रहणासाठी शास्त्रज्ञांकडून तयारी केली जात आहे. ही शतकातून एकदाच येणारी घटना म्हणून याचे वर्णन केले जातंय. चक्क दिवसा ग्रहणाच्या कालावधीच अंधार बघायला मिळेल. यादरम्यान सूर्याच्या आसपास अनेक बदल आपल्याला बघायला मिळतील.

हे सूर्यग्रहण गेल्या 100 वर्षातील सर्वात मोठे सूर्यग्रहण असणार आहे. दिवसा अंधार होणार असल्याने या सूर्यग्रहणाचा कालावधी महत्वाचा आहे. विशेष म्हणजे हे ग्रहण तब्बल 6 मिनिटांच्या आसपास दिसले. सूर्यग्रहणाचा कालावधी 3 मिनिटे 10 सेकंद असतो. मात्र, हे ग्रहण 100 वर्षातील सर्वात मोठे ग्रहण आहे आणि त्याचा कालावधी देखील दुप्पट म्हणजे 6 मिनिटांच्या पुढे असणार आहे. दिवसा तब्बल 6 मिनिटांपेक्षा जास्त म्हणजेच 6 मिनिटे 22 सेकंद पूर्ण अंधार होईल.

या 6 मिनिटांमध्ये पृथ्वीभोवती काही बदल होतील. विशेष म्हणजे हे सूर्यग्रहण अटलांटिक महासागरात सुरू होईल. याचा शेवट हिंदी महासागरात होईल. जवळपास सर्वच देशांमध्ये हे सूर्यग्रहण दिसणार असल्याने मोठा उत्साह खगोल प्रेमिंनीमध्ये दिसतोय. लाखो लोक हे ग्रहण बघू शकणार आहेत. इतका जास्त वेळ असलेले सूर्यग्रहण शतकानंतर पुन्हा बघायला मिळेल, त्या अगोदर नाही.

हे पूर्ण सूर्यग्रहण भारताच्या राजस्थान, गुजरात, गोवा आणि महाराष्ट्रातून दिसेल. 2 ऑगस्ट 2027 रोजी दुपारी भारतीय वेळेनुसार, 4 ते 6 च्या दरम्यान दिसेल. सूर्यग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. चंद्र, सूर्य आणि पृथ्वी यांच्या संयोगात घडते. जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो आणि सूर्य पूर्णपणे अस्पष्ट होतो तेव्हा पूर्ण सूर्यग्रहण होते. यादरम्यान काही मिनिटे पूर्णपणे अंधार होतो. हा एक अत्यंत खास क्षण नक्कीच असतो. हे सूर्यग्रहण येमेन, ट्युनिशिया, लिबिया, सौदी अरेबिया, सुदान, इजिप्त, अल्जेरिया, सोमालिया या देशात दिसेल.