‘काही तरी उणीव…’; पंतप्रधान मोदी यांनी राम लल्लाची का मागितली माफी?

500 वर्षांपूर्वी करोडो हिंदूंसाठी सुरू झालेला प्रतीक्षा आणि संघर्ष 22 जानेवारी 2024 रोजी '84 सेकंदांच्या' अभिजीत मुहूर्तावर पूर्ण झाला. सोमवारी अयोध्येतील राम मंदिरात रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला.

काही तरी उणीव...; पंतप्रधान मोदी यांनी राम लल्लाची का मागितली माफी?
PM NARENDRA MODI
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Jan 22, 2024 | 3:58 PM

अयोध्या | 22 जानेवारी 2024 : आजचा हा सूर्य अद्भूत आभा घेऊन आला आहे. 22 जानेवारी 2024 ही फक्त कॅलेंडरवरील तारीख नाही. तर, हा एक नव्या कालचक्राचा उमंग आहे. राम मंदिराच्या भूमीपूजनानंतर प्रत्येक दिवस संपूर्ण देशात उमंग आणि उत्साह वाढत जात होता. 500 वर्षांपूर्वी सुरू झालेली कोट्यवधी हिंदूंची प्रतीक्षा आणि संघर्ष सोमवारी अयोध्येत रामलल्लाच्या अभिषेकने पूर्ण झाला. राम मंदिरासाठी 500 वर्षांचा संघर्षही संपुष्टात आला आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदी पटेल हे प्रमुख नेते उपस्थित होते. रामलल्लाच्या सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी राम लल्लाची माफी मागितली.

500 वर्षांपूर्वी करोडो हिंदूंसाठी सुरू झालेला प्रतीक्षा आणि संघर्ष 22 जानेवारी 2024 रोजी ’84 सेकंदांच्या’ अभिजीत मुहूर्तावर पूर्ण झाला. सोमवारी अयोध्येतील राम मंदिरात रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी एकीकडे या ऐतिहासिक क्षणाचे महत्त्व सांगितले आणि दुसरीकडे राम लल्लाची माफीही मागितली. मंदिर बांधण्यासाठी लागलेल्या वेळेबद्दल त्यांनी राम लल्लाची माफी मागितली.

प्रभू रामचंद यांच्या त्या कालखंडात तो वियोग १४ वर्षाचा होता. या युगात अयोध्या आणि देशवासियांनी शेकडो वर्षाचा वियोग सहन केला. आपल्या अनेक पिढ्यांनी वियोग सहन केला. भारताच्या संविधानात पहिल्याच प्रतीमध्ये भगवान राम विराजमान आहे. राम मंदिरासाठी कायदेशीर लढाई सुरू राहिली. भारताच्या न्यायपालिकेचे न्यायाची लाज राखली म्हणून त्यांचे आभार मानतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

देशवासियांना मिळालेल्या न्यायाचे परिणाम म्हणून प्रभू रामाचे मंदिरही न्यायबद्ध पद्धतीने झाले. संपूर्ण देश दिवाळी साजरी करत आहे. संध्याकाळी घराघरात रामज्योती प्रज्वलीत केली जाणार आहे. आपल्याला संयमाचा वारसा मिळाला आहे. आज रामाचे मंदिर मिळाले आहे. आजच्या हजारो वर्षानंतरही लोक आजच्या क्षणाची चर्चा करेल असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

आपण हा क्षण जगत आहोत ही मोठी रामकृपा आहे. आज दिवस, दिशा, सर्व काही दिव्यतेने भारलेलं आहे. जिथे रामाचे काम असते तिथे पवन पुत्र हनुमान अवश्य येतात. त्यामुळे मी रामभक्त हनुमान आणि हनुमान गढीला प्रणाम करतो. सीता, लक्ष्मण, भरत आणि सर्वांना प्रणाम करतो. सरयूलाही प्रणाम करतो. ज्यांच्या आशीर्वादाने हे काम पूर्ण झालं आहे, ते दिव्य आत्मा आपल्या आसपास आहेत. पण, मी प्रभू श्रीरामाकडे क्षमायाचनाही करत आहे. आमच्या त्याग आणि तपस्येत काही तरी कमतरता राहिली असेल. त्यामुळेच इतकी शतके आपण हे काम पूर्ण करू शकलो नाही अशी खंत पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली. मात्र, आज ही उणीव भरून निघाली आहे. मला विश्वास आहे प्रभू राम आज आपल्याला अवश्य क्षमा करतील असे त्यांनी सांगितले.