AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lockdown : लॉकडाऊनमध्ये मुलगा अडकला, आईने तब्बल 1400 किमी स्कूटर चालवून परत आणलं

लॉकडाऊनमध्ये अडलेल्या आपल्या मुलाला परत आणण्यासाठी एका आईने तब्बल 1400 किलोमीटरचा प्रवास केला आहे.

Lockdown : लॉकडाऊनमध्ये मुलगा अडकला, आईने तब्बल 1400 किमी स्कूटर चालवून परत आणलं
| Updated on: Apr 10, 2020 | 1:46 PM
Share

हैद्राबाद : लॉकडाऊनमध्ये अडलेल्या आपल्या मुलाला (Son Stuck In Lockdown) परत आणण्यासाठी एका आईने तब्बल 1400 किलोमीटरचा प्रवास केला आहे. तीन दिवसात ही आई आपल्या मुलाला परत घरी घेऊन आली आहे. ही घटना तेलंगाणाच्या निजामाबाद येथील (Son Stuck In Lockdown) आहे.

तेलंगणा येथील निजामाबाद जिल्ह्यात राहणाऱ्या 50 वर्षीय रजिया बेगम या सोमवारी सकाळी स्थानिक पोलिसांची परवानगी घेऊन एकट्या गाडीने आंध्रप्रदेशच्या नेल्लौरच्या दिशेने निघाल्या. हे अतंर जवळपास 700 किलोमीटरचं होतं.

लॉकडाऊनमुळे सर्व रस्ते हे निर्मनुष्य झाले आहेत. याचं सुन्या महामार्गांवरुन स्कूटर चालवत नेल्लौरला पोहचल्या. त्यानंतर आपल्या मुलाला स्कुूटरवर मागे बसवून त्या बुधवारी सायंकाळी निजामाबादला त्यांच्या घरी घेऊन आल्या. या संपूर्ण प्रवासादरम्यान रजिया बेगम यांनी 1400 किलोमीटरपर्यंत स्कूटर चालवली (Son Stuck In Lockdown). म्हणजेच त्यांनी दरदिवसाला जवळपास 470 किलोमीटर स्कूटर चालवला.

अशी हिम्मत एक आईच करु शकते

रजिया बेगम सांगतात, “टू-व्हीलरने हा प्रवास खूप कठीण होता. मुलाला आणण्यासाठी माझ्या जिद्दीने सर्व भीत निघाली. हो पण, रात्री मला खूप भीती वाटली जेव्हा रस्त्यावर नाही कुठला माणूस होता, नाही कुठली वाहतूक.”

रजिया बेगम या निजामाबाद जिल्ह्याच्या बोधन परिसरात एक सरकारी शाळेत प्राध्यापिका आहेत. बोधन हे हैद्राबादपासून 200 किलोमीटर दूर आहे. रजियाचे पती यांचा 15 वर्षांपूर्वी निधन झालं. त्यांचा 17 वर्षीय मुलगा निजामुद्दीन हा एमबीबीएससाठी तयारी करत आहे. निजामुद्दीनहा नेल्लौरला त्याच्या मित्राला सोडायला गेला होता. पण, लॉकडाऊन झाल्याने तो तिथेच फसला.

रजिया त्यांच्या मोठ्या मुलाला निजामुद्दीनला घ्यायला पाठवणार होत्या. मात्र, लॉकडाऊनच्या कडक नियमांमुळे त्यांनी स्वत: स्कूटरने निजामुद्दीनला घ्यायला जाण्याचा विचार केला. प्रवासादरम्यान, खाण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात चपात्या पॅक केल्या होत्या. रस्त्यात जेव्हा त्यांना तहाण लागायची तेव्हा त्या पेट्रोल पंपावर थांबून पाणी प्यायच्या. याप्रमाणे तीन दिवस 1400 किलोमीटरचा प्रवास करुन त्यांनी आपल्या मुलाला (Son Stuck In Lockdown) परत आणलं.

संबंधित बातम्या :

चोराला पकडला, वैद्यकीय चाचणीत कोरोना झाल्याचं उघड, 17 पोलीस, न्यायाधीश, कोर्ट कर्मचारी क्वारंटाईन

देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 5734 वर, 24 तासात 549 नवे रुग्ण

भारताचे ऋण विसरणार नाही, ट्रम्प नमले, मोदी म्हणतात मानवतेच्या युद्धात अमेरिकेसोबत

ना महाराष्ट्र, ना तेलंगणा, ‘या’ राज्याने 30 एप्रिलपर्यंत वाढवला लॉकडाऊन

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.