Sonam Wangchuk Ends Hunger Strike : सरकारने कोणत्या 3 अटी मान्य केल्यानंतर सोनम वांगचूक यांनी सोडलं उपोषण

Sonam Wangchuk Ends Hunger Strike : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी तब्बल 26 दिवसानंतर आमरण उपोषण सोडलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी त्यांनी आमरण उपोषण सुरु केलं होतं.

Sonam Wangchuk Ends Hunger Strike : सरकारने कोणत्या 3 अटी मान्य केल्यानंतर सोनम वांगचूक यांनी सोडलं उपोषण
Sonam Wangchuk
| Updated on: Jul 24, 2026 | 7:59 AM

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी तब्बल 26 दिवसानंतर आमरण उपोषण सोडलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी त्यांनी आमरण उपोषण सुरु केलं होतं. रात्री उशिरा केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या भेटीनंतर सोनम वांगचूक यांनी उपोषण मागे घेत असल्याचं जाहीर केलं. दोन्ही मंत्र्यांनी मेदांता रुग्णालयात जाऊन सोनम वांगचूक यांची भेट घेतली. सोनम वांगचूक यांनी सहज हे उपोषण सोडलं नाही. त्यांच्या काही अटी केंद्र सरकारला मान्य करायला लावल्या. त्यानंतर त्यांनी हे उपोषण सोडलं आहे.

“हे पाऊल अनेक अटी, दीर्घ चर्चा आणि देशातील संभाव्य हिंसाचार लक्षात घेऊन उचललं आहे. मी लवकरच एका व्हिडिओ पोस्ट करुन त्यात या अटींबद्दल विस्ताराने सांगणार आहे. मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो की, तुम्ही सतर्क रहा आणि कुठलाही हिंसाचार नाही झाला पाहिजे” असं सोनम वांगचूक उपोषण सोडल्यानंतर म्हणाले.

सोनम वांगचूक यांच्या कुठल्या अटी सरकारने मान्य केल्या?

20 जुलै रोजी कॉकरोच जनता पार्टीने संसदेवर मार्च काढला होता. यावेळी मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. या प्रकरणात विद्यार्थ्यांवर कोणताही गुन्हा दाखल होणार नाही असा शब्द सराकरने त्यांना दिला आहे.

पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांसाठी संसदेत सरकार चर्चा करेल असं आश्वासन त्यांना दिलं आहे.

नीट (NEET) पेपरफुटीमुळे काही विद्यार्थ्यांनी जीवन संपवण्यासारखा टोकाचा निर्णय घेतला. त्यांना नुकसान भरपाई देण्याचा विचार होईल असं आश्वासन सरकारने दिलं आहे.

केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी सरकारच्या या निर्णयांची माहिती दिल्यानंतर सोनम वांगचूक यांनी नड्डा यांच्या हातून ज्यूस पिऊन उपोषण सोडलं.

Follow Us