AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रुग्णालयातून डिस्चार्ज, पण घरी जाणार नाहीत सोनम वांगचुक, मोठा निर्णय, सर्वात अगोदर..

सोनम वांगचुक यांच्या उपोषणाने कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला मोठे बळ मिळाले. सोनम वांगचुक यांनी तब्बल 26 दिवस उपोषण केले. अखेर त्यांची प्रमुख मागणी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही सरकारकडून मान्य करण्यात आली. आता सोनम वांगचुक यांनी मोठा निर्णय घेतला.

रुग्णालयातून डिस्चार्ज, पण घरी जाणार नाहीत सोनम वांगचुक, मोठा निर्णय, सर्वात अगोदर..
Sonam Wangchuk
| Updated on: Jul 27, 2026 | 2:01 PM
Share

दिल्लीतील जंतर मंतर येथे मोठे आंदोलन झाले. कॉकरोच जनता पार्टीकडून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला देशभरातून प्रतिसाद मिळाला. विद्यार्थी रस्त्यावर उतरले. एक मोठे आंदोलन उभे राहिले. आंदोलक आक्रमक होताना दिसले. पोलिसांना दिल्लीत लाठीचार्ज करावा लागला. पोलिसांनाही मारहाण झाली. मुंबई, पटनासह अन्य मोठ्या शहरांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले. अखेर सरकारने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. हा मोदी सरकारमधील पहिला राजीनामा ठरला. विरोधकांकडून पावसाळी अधिवेशनातही मोठा हंगामा केला जात आहे. पेपरफुटीविरोधाती विधेयक संसदेत आज ठेवण्यात आले. पेपरफुटीविरोधात कडक पाऊले उचलली जात आहेत. अभिजीत दिपकेच्या आंदोलनाला खरे बळ सोनम वांगचुक यांच्यामुळे मिळाले. सोनम वांगचुक तब्बल 26 दिवस उपोषणावर होते.

सोनम वांगचुक यांची तब्येत खालावल्याने सरकारकडून त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. सोनम वांगचुक यांच्यानंतर अभिजीत दिपकेने उपोषणाची धूरा आपल्या हातात घेतली. जेपी नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोनम वांगचुक यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना केली.

आता सोनम वांगचुक यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून, त्यांनी सोशल मीडियावर एका व्हिडिओद्वारे ही माहिती दिली. पण डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते लगेचच घरी जाणार नाहीत. सोनम वांगचुक सर्वात अगोदर आपल्या घरी न जाता राजघाटावर जाणार आहेत, याबाबतची माहिती त्यांनी स्वत: दिली. सोनम वांगचुक यांच्या चांगल्या आरोग्यासाठी देशभरातून प्रार्थना करण्यात आल्या.

सोनम वांगचुक यांची तब्येत सतत खालावत होती. त्यानंतर सरकारने अचानक त्यांना जंतर मंतरवरून थेट रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर आता सोनम वांगचुक यांची तब्येत सुधारताना दिसत आहे. सोनम वांगचुक यांच्या उपोषणामुळे या आंदोलनाला बळ मिळाले. देशभरातून लोक सोनम वांगचुक यांचे समर्थन करताना दिसले. शेवटी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर त्यांना यश मिळाले. अभिजीत दिपके देखील जंतर मंतरमधील आंदोलनानंतर अद्याप आपल्या घरी पोहोचला नाही. याबाबत कुटुंबियांनीच माहिती दिली.

Follow Us
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...