सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली, दिल्ली हायकोर्टाची केंद्रासह दिल्ली सरकारला नोटीस, मोठी अपडेट काय?

Delhi High Court on Sonam Wangchuk: NEET परीक्षा पेपरफुटीविरोधात सोनम वांगचुक हे जंतरमंतरवर उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती खालावली आहे. याची गंभीर दखल घेत दिल्ली उच्च न्यायालयाने हायकोर्टाला नोटीस बजावली आहे.

सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली, दिल्ली हायकोर्टाची केंद्रासह दिल्ली सरकारला नोटीस, मोठी अपडेट काय?
सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली... हायकोर्टाची सरकारला नोटीस
| Updated on: Jul 15, 2026 | 2:16 PM

Delhi High Court on Sonam Wangchuk: दिल्लीतील जंतर-मंतरवर गेल्या 17 दिवसांपासून सामाजिक आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे उपोषण सुरू आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने त्याची गंभीर दखल घेतली आहे. हायकोर्टाने केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारला नोटीस बजावली आहे. सरकारला बुधवारपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. NEET परीक्षा पेपरफुटीविरोधात वांगचुक यांचे उपोषण सुरू आहे.

हायकोर्टात जनहित याचिका

दिल्ली उच्च न्यायालयात एक जनहित याचिका(PIL) दाखल करण्यात आली आहे. सोनम वांगचुक यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे आणि आवश्यक वैद्यकीय उपचार उपलब्ध करून द्यावी अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. गरज भासल्यास त्यांना फोर्स फीडिंग, जबरदस्तीने द्रव आहार द्यावा, जीवनसत्वे आणि इतर पोषक तत्वे देण्याचेही निर्देश द्यावेत अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. वकील राकेश कुमार सैनी यांनी ही लोकहितवादी याचिका दाखल केली आहे. या उपोषणामुळे वांगचुक यांची प्रकृती झपाट्याने खालावली आहे. वेळेत उपाचार न मिळाल्यास त्यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

वांगचुक यांचे 8.5 किलो घटले वजन, रक्तदाबही कमी

सोनम वांगचुक यांचे 8.5 किलो वजन घटले. त्यांचा रक्तदाब 109/70 असा घसरला आहे. त्यांच्या जीवाला धोका असल्याने त्यांच्यावर तातडीने उपचार करण्याची गरज याचिकेत व्यक्त करण्यात आली आहे. काही अनुचित घटना घडल्यास ही देशासाठीच नाही तर जगासाठी दुर्दैवी आणि लज्जास्पद बाब ठरेल असा याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

28 जूनपासून जंतर-मंतरवर उपोषण

सोनम वांगचुक यांनी नीट परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटीविरोधात उपोषण सुरू केले आहे. 28 जूनपासून ते दिल्लीतील जंतर-मंतर येथे बेमुदत उपोषणावर बसले आहेत. त्याला आता 17 दिवस झाले आहेत. शिक्षण व्यवस्थेत व्यापक सुधारणाची मागणी त्यांनी केली आहे. पेपरफुटीमुळे प्रभावित विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा यासह इतर मागण्यांसाठी वांगचुक हे उपोषण करत आहेत. वांगचुक यांच्या प्रकृतीची खालावल्याच्या पोस्ट, व्हिडिओ आणि छायाचित्र सध्या सोशल मीडियावर शेअर होत आहेत. नागरीक चिंता व्यक्त करत आहेत.

Follow Us