Sonia Gandhi : कोरोनामुळे प्रकृती खालावली! सोनिया गांधी यांच्यावर नवी दिल्लीतील गंगाराम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु

| Updated on: Jun 12, 2022 | 2:52 PM

नवी दिल्लीतील गंगाराम हॉस्पिटलमध्ये सोनिया गांधी यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं

Sonia Gandhi : कोरोनामुळे प्रकृती खालावली! सोनिया गांधी यांच्यावर नवी दिल्लीतील गंगाराम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली : सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची प्रकृती खालावली असल्याचं वृत्त हाती येतंय. नवी दिल्लीतील (New Delhi) गंगाराम हॉस्पिटलमध्ये (Gangaram Hospital) सोनिया गांधी यांना पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. गेल्या आठवड्यातच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर घरीच उपचार सुरु होते. दरम्यान, आता त्यांची प्रकृती खालावली असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावं लागलंय. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली होती. 2 जून रोजी त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचं निदान झालं होतं. त्याआधी काही दिवसांपासून सोनिया गांधीच्या काँग्रेस नेत्यांसोबत बैठका सुरु होत्या. दरम्यान, आता सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर प्रियंका गांधी यांनाही कोरोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं होतं.

कोरोनामुळे प्रकृती खालावली!

1 जून रोजी संध्याकाळी सोनिया गांधी यांना ताप आला होता. तापाची हलकी लक्षणं समोर आल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आलेली. ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली असल्याच स्पष्ट झालं होतं.

गांधी यांच्यावर उपचार सुरु

कोरोनामुळेच त्यांची प्रकृती खालावली असून पुढील उपचारासाठी त्यांना आता रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. नवी दिल्लीतील गंगाराम हॉस्पिटलमध्ये सोनिया गांधी यांच्यावर उपचार सुरु आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांचं पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे.

23 तारखेला हजर राहण्याचे आदेश

8 जून रोजी ईडीनं सोनिया गांधी यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांनी नवी तारीख द्यावी, अशी विनंती केली होती. त्यानंतर ईडीने नवी नोटीस पाठवत सोनिया गांधी यांना 23 जूनला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश जारी केले होते. दरम्यान, आता पुन्हा सोनिया गांधी यांची प्रकृती खालावल्यामुळे 23 तारखेला तरी त्या चौकशीसाठी हजर राहतात का, हे पाहणं महत्त्वाचंय. सोनिया गांधी यांचा जन्म 9 डिसेंबर 1946 रोजी झाला होता. आता त्याचं वय 76 वर्ष असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.