तुमच्या हॉटेलच्या रूममध्ये असलेला स्पाय कॅमेरा या ट्रीकने एका सेकंदात ओळखा, वेटरने सांगितलं टॉप सिक्रेट

हॉटेलच्या रूममध्ये स्पाय कॅमेरे आढळून आल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. तुमच्या हॉटेलच्या रूममध्ये जर स्पाय कॅमेरा असेल तर तो कसा ओळखायचा याची एक सोपी ट्रीक एका हॉटेलच्या माजी कर्मचाऱ्याने सांगितली आहे.

तुमच्या हॉटेलच्या रूममध्ये असलेला स्पाय कॅमेरा या ट्रीकने एका सेकंदात ओळखा, वेटरने सांगितलं टॉप सिक्रेट
हॉटेलमधील छुपे कॅमेरे कसे ओळखायचे?
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 10, 2026 | 8:45 PM

आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी ट्रिपचा प्लॅन करतो, तेव्हा सगळ्यात आधी आपण कोणती गोष्ट करत असू तर ते म्हणजे त्या ठिकाणी एखादं छानसं हॉटेल बुक करतो. एकदा हॉटेल बुक झालं की आपल्याला पुढच्या ट्रिपचा प्लॅन करणं सोपं जातं. अनेकदा आपण ऑनलाईन पद्धतीने हॉटेल बुक करतो, त्यामुळे आपल्याला त्या हॉटेलबद्दल फारशी माहिती नसते. मात्र तरी देखील त्या हॉटेलबद्दलचे रिव्हू पाहून संबंधित हॉटेल बुक करायचं की नाही याचा निर्णय आपण घेत असतो. तर अनेकदा असं देखील होतं की आपण जिथे ट्रिप प्लॅन केली आहे, तिथे आधीच आपले कोणी तरी नातेवाईक, मित्र मैत्रीण जाऊन आलेले असतात. त्यावेळी ते ज्या हॉटेलमध्ये राहिले आहेत, त्याबद्दल ते माहिती देतात. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आपण त्या हॉटेलची निवड करतो.

मात्र जेव्हा आपल्याला एखाद्या हॉटेलबद्दल फारशी माहिती नसते, तेव्हा जर आपण ती हॉटेल बुक करत असू तर त्यामध्ये थोडीशी रिस्क असू शकते, कारण अनेकदा काही हॉटेलच्या रूममध्ये स्पाय कॅमेरे आढळून आल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. त्यामुळे अशा नवीन ठिकाणी सावध असणं गरजेचं असतं. मात्र या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की प्रत्येक हॉटेलमध्येच तुम्हाला असा अनुभव येईल असं नाही.

Loading...

रुममध्ये कुठे-कुठे असू शकतात स्पाय कॅमेरे?

हॉटेलच्या एका माजी वेटरने दिलेल्या माहितीनुसार हॉटेलमध्ये जेवढ्या काही इलेक्ट्रीक किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत, जसं की फॅन, टीव्ही, ट्युबलाईट  अशा ठिकाणी स्पाय कॅमेरे असण्याची शक्यता अधिक असते. त्यासोबतच बाथरूममध्ये देखील असे स्पाय कॅमेरे लावले जाऊ शकतात. हॉटेलमध्ये जिथे -जिथे काच आहे, तिथे देखील या पद्धतीने कॅमेरे लपवले जाऊ शकतात.

स्पाय कॅमेरा कसा ओळखायचा?

यासाठी या हॉटेलच्या माजी कर्मचाऱ्याने एक सोपी ट्रीक सांगितली आहे, सर्व प्रथम तुम्ही तुमच्या हॉटेलच्या रुमचे सर्व दरवाजे बंद करा, आणि लाईट देखील ऑफ करा. त्यानंतर तुमच्या मोबाईलचा टॉर्च ऑन करा, मोबाईलचा टॉर्च ऑन झाल्यानंतर त्याचा सर्व फोकस एकाच जागी केंद्रीत होत असल्यामुळे तुम्ही संपूर्ण हॉटेलच्या रूमची तपासणी करू शकता, जर स्पाय कॅमेरा असेल तर तो लगेच डिकेक्ट होण्यास मदत होते, असं या कर्मचाऱ्याने म्हटलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us