AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ISI साठी हेरगिरी करणाऱ्या आणखी एकास अटक, 90 दिवस त्याचा पाकिस्तानात होता मुक्काम

देशात पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारे काही एजंट वेगवेगळ्या राज्यात सापडले. त्यात यूट्यूबर ज्योती मल्होत्राचाही समावेश आहे. आता कासिम नावाचा व्यक्ती पाकिस्तानच्या आयएसआयसाठी काम करत असल्याचे स्पष्ट झाले. राजस्थानातील डीग जिल्ह्यातील गंगोरा गावचा तो रहिवासी आहे.

ISI साठी हेरगिरी करणाऱ्या आणखी एकास अटक, 90 दिवस त्याचा पाकिस्तानात होता मुक्काम
आयएसआय एजंट कासीम
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: May 30, 2025 | 7:33 AM
Share

Pakistan Spy Arrested: ऑपरेशन सिंदूरनंतर देशात पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारे काही एजंट सापडले. सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेली ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती. तिच्यासह पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली वेगवेगळ्या राज्यांमधून अनेकांना अटक करण्यात आली आहे. त्यात आणखी एकाने भर पडली आहे. आता राजस्थानातील भरतपूर जिल्ह्यातून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर भारताशी विश्वासघात केल्याचा आरोप आहे. कासिम नावाचा हा व्यक्ती पाकिस्तानच्या आयएसआयसाठी काम करत होता. राजस्थानातील डीग जिल्ह्यातील गंगोरा गावचा तो रहिवासी आहे. याआधी तो दिल्लीतही राहिला आहे.

पोलिसांच्या तपासात कासिमची मावशी पाकिस्तानात राहत असल्याचे समोर आले. त्याने गेल्या वर्षी आणि या वर्षी एकूण दोनदा पाकिस्तानला भेट दिली आहे. त्याचे काही भारतीय मोबाईल नंबर पाकिस्तानी गुप्तचर एजंटशी संपर्क साधण्यासाठी वापरले जात होते. या नंबर्सद्वारे भारतात हेरगिरी केली जात आहे. तो संवेदनशील माहिती पाकिस्तानला पाठवत होता. तसेच तो भारताचे सिमकार्ड पाकिस्तानला पाठवत होता. त्यानंतर त्या सीमकार्डद्वारे पाकिस्तानी एजंट व्हॉट्सअॅपद्वारे भारतीयांशी संपर्क साधून लष्कर आणि सरकारी कार्यालयांशी संबंधित संवेदनशील माहिती मिळवत होते.

90 दिवस पाकिस्तानात मुक्काम

कासिमसंदर्भात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. तो ऑगस्ट 2024 आणि त्यानंतर मार्च 2025 मध्ये पाकिस्तानात गेला होता. त्यावेळी तो पाकिस्तानात एकूण 90 दिवस थांबला होता. त्या ठिकाणी आयएसआयच्या एजंटची त्याने त्या काळात भेट घेतली होती. कासिम हेरगिरी करत असल्याचे उघड झाल्यावर त्याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिच्या तीन फोनमधून 12 टीबी डेटा काढण्यात यश आले आहे. त्यात चॅट रिकॉर्ड, कॉल लॉग, व्हिडियो फुटेट आणि आर्थिक व्यवहाराची माहिती आहे. फोनमधून मिळालेल्या डेटाची तपासणी करण्याचे कामही सुरु आहे. तिच्या संपर्कात चार आयएसआय एजंट होते. पाकिस्तानात फिरण्यासाठी तिला विशेष सुविधा दिला जात होती.

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?