छत्तीसगडमध्ये एसआरपीएफला मोठं यश, एक कोटींचं बक्षीस असलेल्या माओवाद्याचा खात्मा

तब्बल आठ तास ही चकमक सुरू होती, छत्तीसगड पोलीस आणि एसआरपीएफने राबवलेल्या या शोध मोहिमेला मोठं यश आलं आहे, या सर्च ऑपरेशनमध्ये माओवाद्यांचे अनेक मोठे नेते ठार झाले आहेत. 

छत्तीसगडमध्ये एसआरपीएफला मोठं यश, एक कोटींचं बक्षीस असलेल्या माओवाद्याचा खात्मा
प्रातिनिधिक छायाचित्र
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 11, 2025 | 10:02 PM

छत्तीसगडमधून मोठी बातमी समोर येत आहे, माओवादी संघटनेला पुन्हा एकदा मोठा हादरा बसला आहे. एक कोटी रुपयांचं बक्षीस असलेल्या माओवादी केंद्र समितीच्या सदस्यासह दहा माओवादी ठार झाले आहेत. छत्तीसगड पोलीस व एस आर पी एफच्या जवानांना मोठ यश मिळालं आहे. छत्तीसगड राज्यातील गारियाबंद जिल्ह्यात झालेल्या चकमकीमध्ये दहा माओवादी ठार झाले आहेत, ठार झालेलेल्यांमध्ये एक जण हा माओवादी केंद्र समितीचा सदस्य होता, ज्याच्यावर एक कोटी रुपयांचं बक्षीस होतं.

माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य असलेला माडेम बाल कृष्णा उर्फ बालाना हा माओवादी आज झालेल्या चकमकीमध्ये ठार झाला आहे, त्याच्यावर एक कोटीचं बक्षिस होतं, त्याच्यासोबतच इतर दहा माओवाद्यांना देखील मारण्यात सुरक्षा दलाला यश आलं आहे.  माडेम बाल कृष्णा उर्फ बालाना हा गेल्या अनेक वर्षांपासून माओवादी चळवळीमध्ये सक्रीय होता.   वयाच्या 21व्या वर्षी तो माओवादी संघटनेत सक्रीय झाला, वयाच्या 61 व्या वर्षी आज झालेल्या चकमकीमध्ये छत्तीसगड पोलीस व एसआरपीएफच्या जवानांनी या माओवाद्याला ठार केलं आहे.

आठ तास चकमक   

छत्तीसगड राज्यातील गारियाबंद जिल्ह्यात छत्तीसगड पोलीस व एसआरपीएफच्या माध्यमातून मोठं सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं आहे. या भागात लपून बसलेल्या माओवाद्यांचा या सर्च ऑपरेशनच्या माध्यमातून शोध घेतला जात आहे. आज सर्च ऑपरेशन सुरू असतानाच माओवादी आणि एसआरपीएफमध्ये चकमक झाली, या चकमकीमध्ये माडेम बाल कृष्णा उर्फ बालाना याच्यसह दहा माओवादी ठार झाले आहेत. तब्बल आठ तास ही चकम सुरूच होती. या चकमकीत माओवाद्यांचे अनेक बडे नेते ठार झाले आहेत. ओडिसा माओवादी राज्य समितीचा सदस्य असलेला प्रमोद उर्फ पांडू  याला देखील मारण्यात आलं आहे.

तब्बल आठ तास ही चकमक सुरू होती, छत्तीसगड पोलीस आणि एसआरपीएफने राबवलेल्या या शोध मोहिमेला मोठं यश आलं आहे, या सर्च ऑपरेशनमध्ये माओवाद्यांचे अनेक मोठे नेते ठार झाले आहेत.