AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नेपाळहून येणाऱ्या शिळा पाहण्यासाठी गर्दी, मार्गात जोरदार स्वागत, पूजा

शिळा अयोध्येत पोहोचल्यानंतर ट्रस्ट आपले काम करेल. या शिळा 2 फेब्रुवारीला अयोध्येत पोहचणार आहे. त्या शिळा तब्बल 6 कोटी वर्षे जुन्या आहेत.

नेपाळहून येणाऱ्या शिळा पाहण्यासाठी गर्दी, मार्गात जोरदार स्वागत, पूजा
अयोध्येच आणण्यात येत असलेल्या शिळाImage Credit source: social media
| Updated on: Jan 29, 2023 | 9:32 AM
Share

अयोध्या : माता सीतेचे गाव असलेले जणकपूर म्हणजे नेपाळहून दोन शिळा अयोध्येत येत आहे. 350-400 टन वजनाच्या या शिळा पाहण्यासाठी रस्त्यात गर्दी होत आहे. त्यांची पूजा केली जात आहे. या शिळा सुमारे 6 कोटी वर्षे जुन्या आहेत. या शिळांचे वैशिष्ट म्हणजे यापासून श्रीराम आणि माता सीता यांच्या मूर्ती बनवल्या जाणार आहेत.

नेपाळी लोकांच्या भावनांचा आदर करत श्री रामजन्मभूमी ट्रस्टने जानकी मंदिराला पत्र लिहून कालीगंडकी नदीतील (शालीग्राम नदी)  शिळा काढण्याची विनंती केली होती. TV9 ला मिळालेल्या पत्रात, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय यांनी जानकी माता मंदिराला दोन पत्रे लिहिली असून, कालीगंडक म्हणजेच शालिग्रामी नदीतील शिळा आणि श्री रामाचे धनुष्य देण्याची विनंती केली होती.

आता या दोन्ही शिळा नेपाळमधील पोखरा येथून भूगर्भीय आणि पुरातत्व तज्ज्ञांच्या देखरेखीखाली काढण्यात आल्या. 26 जानेवारी रोजी ट्रकमध्ये भरल्या. त्यांचे पूजन केल्यानंतर दोन्ही शिळा ट्रकने अयोध्येला पाठवण्यात येत आहेत. त्यातील एका शिळाचे वजन 26 टन आहे तर दुसऱ्या शिळाचे वजन 14 टन आहे. म्हणजेच दोन्ही शिळांचे वजन 40 टन आहे.

शिळा 6 कोटी वर्षे जुन्या

राम मंदिर ट्रस्टचे विश्वस्त कामेश्वर चौपाल यांनी सांगितले की, शिळा अयोध्येत पोहोचल्यानंतर ट्रस्ट आपले काम करेल. या शिळा 2 फेब्रुवारीला अयोध्येत पोहचणार आहे. त्या शिळा तब्बल 6 कोटी वर्षे जुन्या आहेत.

काय आहे इतिहास

नेपाळची शालिग्रामी नदी भारतात प्रवेश करताच नारायणी बनते. तिला बुढी गंडकी नदी म्हणतात. या नदीच्या काळ्या शिळांची भगवान शालिग्राम यांनी पूजा केली जाते. शालिग्रामी नदीतच शालिग्राम शिळा सापडते. ही नदी दामोदर कुंडातून उगम पावते आणि बिहारमधील सोनेपूर येथे गंगा नदीला मिळते.

शिळा काढण्यापूर्वी माफी

नदीच्या पात्रातून शिळा काढण्यापूर्वी धार्मिक विधी झाला. नदीची माफी मागण्यात आली. विशेष पूजा केली गेली. नेपाळमधील गाळेश्वर महादेव मंदिरात 26 जानेवारीला शिळांचा रुद्राभिषेकही केला.़

नेपाळचे माजी उपपंप्रधान शिळांसोबत

शिळांसोबत सुमारे 100 लोक भारतात येत आहेत. रस्त्यात्या अनेक ठिकाणी त्यांच्या विश्रांतीची व्यवस्था केली आहे. शिळांसोबत नेपाळचे माजी उपपंतप्रधान कमलेंद्र निधी, जनकपूरचे महंत येत आहेत. ते अयोध्येपर्यंत येतील. राममंदिर ट्रस्टचे सदस्य कामेश्वर चौपाल हेही यात्रेसोबत आहेत.

रामजन्मभूमीचे जुने मंदिर

शालिग्रामी शिळा खूप मजबूत आहेत. त्यामुळे कारागीर बारीकसारीक गोष्टी कोरतात. अयोध्येतील रामाची धूसर मूर्ती अशा प्रकारच्या शिळेवर कोरलेली आहे. रामजन्मभूमीच्या जुन्या मंदिरातील कसौटीचे अनेक खांब यापासून बनवलेले आहेत.

अयोध्या राम मंदिरासाठी शिळा

मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी
मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी.
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका.
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.