‘नेहरू, वाजपेयी यांच्या मूर्खपणामुळे तिबेट आणि तैवान चीनचे झाले; सुब्रमण्यम स्वामींनी विश्वगुरू नरेंद्र मोदींनाही निकालात काढलं…

| Updated on: Aug 04, 2022 | 7:13 AM

नेहरू आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या मूर्खपणामुळे तिबेट आणि तैवान हा चीनचा भाग झाले आहेत असे भारतीय मानतात मात्र आता चीन वास्तविक नियंत्रण रेषेवरील करार पाळत नाही आणि त्या गोष्टीचा ते आदरही करत नाही. तर लडाखमधील भारतीय भूमीवर तिकडून कब्जा केला जात आहे.

नेहरू, वाजपेयी यांच्या मूर्खपणामुळे तिबेट आणि तैवान चीनचे झाले; सुब्रमण्यम स्वामींनी विश्वगुरू नरेंद्र मोदींनाही निकालात काढलं...
Follow us on

मुंबईः सुब्रमण्यम स्वामी यांनी आता भारत चीनच्या सीमेचा वाद उखरून काढून देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (foemer PM Pandit Jawaharlal Nehru), अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) आणि सध्याचे नरेंद्र मोदी यांनी अक्षरशः वेड्यात काढले आहे. ते म्हणाले की, चीन सीमा मुद्द्यावर एलएसी कराराचा आदर करत नाही आणि लडाखमध्ये भारतीय जमिनीवर त्यांच्याकडून कब्जा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे सगळे प्रकार चालू असतानाही आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र सीमेवर ‘कोणी आलेच नाही’ असे वक्तव्य करत असतात असा जोरदार प्रहार त्यांनी केला आहे. सुब्रमण्यम स्वामींनी (Subramaniam Swamy) केलेले ट्विट असो की त्यांनी केलेले वक्तव्य असो या दोन्हींमुळेही अनेकदा भारतीय राजकारणात गदारोळ माजला आहे. आताही त्यांनी नेहरूंपासून ते अगदी पंतप्रधान मोदींपर्यंत त्यांनी सगळ्यानाच मुर्ख म्हणून निकालात काढलं आहे.

 

नेहरू, वाजपेयींचा मूर्खपणा…

भाजपचे माजी केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी तिबेट आणि तैवानला चीनचा भाग मानत असल्याबद्दल भारताच्या माजी पंतप्रधानांवर जोरदार निशाणा साधला आहे. जवाहरलाल नेहरू आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या ‘मूर्खपणा’मुळे भारतीयांना तिबेट आणि तैवान हा चीनचा भाग मानावे लागले असा आरोप आता सुब्रमण्यम स्वामी यांनी केला, त्याबाबतचे ट्विटही त्यांनी केल्यामुळे नव्या वादाला आता तोंड फुटले आहे.

…आणि तरीही नरेंद्र मोदी अविर्भावात

सुब्रमण्यम स्वामी म्हणतात की चीन सीमाप्रश्नावर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) कराराचा कोणाकडून आदर केला जात नाही. आणि लडाखमध्ये भारतीय जमिनीवरच कब्जा केला जात आहे. हा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहेच मात्र त्याबरोबरच सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला. चिनी सैनिक भारतीय सीमेवर घुसूनही नरेंद्र मोदी मात्र सीमेवर कोणीही आले नाही अशा अविर्भात असतात असं त्यांचे मत आहे.

चीनला सांगितले पाहिजे…

नेहरू आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या मूर्खपणामुळे तिबेट आणि तैवान हा चीनचा भाग झाले आहेत असे भारतीय मानतात मात्र आता चीन वास्तविक नियंत्रण रेषेवरील करार पाळत नाही आणि त्या गोष्टीचा ते आदरही करत नाही. तर लडाखमधील भारतीय भूमीवर तिकडून कब्जा केला जात आहे. सीमारेषेवर अशी परिस्थिती असतानाही मात्र नरेंद्र मोदी आपल्या हद्दीत कोणी आलेच नाही हेच सांगत आहेत. त्यामुळे त्यांनी हे असे निर्णय घेण्यासाठी आमच्या इथे निवडणुका घेतल्या जातात हेही चीनने समजून घेतले पाहिजे असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

चीनकडून तीव्र ‘आक्षेप’

अमेरिकेच्या संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी या तैवानच्या दौऱ्यावर आहेत, आणि अशा परिस्थितीतच सुब्रमण्यम स्वामी यांनी अशी वक्तव्य केली आहेत. या गोष्टीवर चीनकडून तीव्र ‘आक्षेप’ व्यक्त केला जात असून त्यामुळे अमेरिकेला त्याचा मोठा फटका बसू शकतो असा इशाराही त्यांनी दिला आहे.

‘वन चायना’ या धोरण

‘वन चायना’ या धोरणाचे सातत्याने अमेरिकेकडून उल्लंघन करून त्याला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे अमेरिका आगीशी खेळण्यातला प्रकार करत आहे, त्यामुळे हे त्यांच्यासाठी धोकादायक असल्याने जो आगीशी खेळतो त्याचा त्याच्यामध्ये नाश होतो असंही म्हटलं दात आहे.

नॅन्सी पेलोसी तैवानला पोहोचल्यानंतर त्यांनी अधिकृत निवेदन जाहीर करुन सांगितले की, अमेरिका तैवानच्या जीवंत लोकशाहीला पाठिंबा देण्यासाठी वचनबद्ध आहे. त्यामुळे आमचे काँग्रेस शिष्टमंडळाची तैवानला दिलेल्या भेटीच्या या वचनबद्धतेचा सन्मान करत आहे. आमचा दौरा हा इंडो-पॅसिफिक प्रदेश–सिंगापूर, मलेशिया, दक्षिण कोरिया आणि जपानच्या लांब आणि प्रदीर्घ दौऱ्याचाच एक भाग असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी पेलोसी यांनी सांगितले की, या भेटीत परस्पर सुरक्षा, आर्थिक भागीदारी आणि लोकशाही शासनाच्या अनेक मुद्यांवर लक्ष केंद्रित केले गेले आहे.