Iran Israel War : युद्ध सुरू असतानाच अमेरिकेची मोठी मदत, भारतावरील मोठं संकट टळलं

सध्या मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. मध्य पूर्वेत तणाव निर्माण झाल्यानं कच्च्या तेलाचा तुटवडा जणावत आहे. अशा संकट काळात आता अमेरिका भारताच्या मदतीला धावून आली आहे.

Iran Israel War : युद्ध सुरू असतानाच अमेरिकेची मोठी मदत, भारतावरील मोठं संकट टळलं
trump
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 22, 2026 | 7:39 PM

युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. मध्य पूर्वेतील तणावामुळे आखाती देशांकडून येणारा कच्च्या तेलाचा पुरवठा ठप्प झाल्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणकडून होर्मूजची सामुद्रधुनी बंद करण्यात आली आहे. होर्मूजची सामुद्रधुनी केवळ इराणच्या मित्र राष्ट्रांसाठीच सुरू असेल असं म्हणत इराणने आपली भूमिका स्पष्ट करताना डोनाल्ड ट्रम्प यांना थेट इशारा दिला आहे. दरम्यान मध्य पूर्वेतील तणावाचा भारतावर देखील मोठा परिणाम झाला आहे. भरतात देखील मोठ्या प्रमाणात सध्या नॅचरल गॅसचा तुटवडा जाणवत आहे. व्यावसायिक गॅस उपलब्ध होत नसल्यानं अनेक हॉटेल व्यावसायिकांना आपल्या हॉटेल बंद ठेवण्याची वेळ आली आहे. यामुळे त्यांचं मोठं नुकसान होत आहे. याचदरम्यान आता भारतासाठी एक गुडन्यूज समोर आली आहे.

याचदरम्यान अमेरिकेच्या टेक्सासमधून एलपीजीची खेप घेऊन एक मोठं मालवाहू जहाज भारताच्या मंगलोर बंदरात दाखल झालं आहे. याशिवाय एक रशियाचं तेलाची वाहतूक करणारं जहाज देखील मंगलोर बंदरात दाखल झालं आहे. हे रशियाचं जहाज तेल घेऊन चीनला निघालं होतं, मात्र ते भारतामध्ये पोहोचलं आहे. त्यामुळे आता भारताला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे, काही प्रमाणात का होत नाही, भारतावरील तेल आणि गॅस संकट दूर होण्याची चिन्ह आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी

युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने स्ट्रेट ऑफ होमूर्ज वाहतुकीसाठी बंद केलं आहे, त्यामुळे अनेक जहाज अजूनही तिथेच अडकून पडली आहे. कच्च्या तेलाच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा संयम सुटला असून, त्यांनी इराणला थेट धमकीच दिली आहे. इराणकडे आता 48 तास बाकी आहेत, जर त्यांनी पुढच्या 48 तासांमध्ये स्ट्रेट ऑफ होमूर्ज सुरू केला नाही तर आम्ही इराणवर भीषण हल्ला करू असा इशाराच ट्रम्प यांनी दिला आहे. तर दुसरीकडे भारतामधील इंधन पुरवठा आता हळुहळु पूर्वपदावर येत असल्याचं पहायला मिळत असून, हॉटेल चालकांना आता वीस टक्के गॅस पुरवठा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

 

Follow Us