AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ईशा संस्थेचा गॅसिफायर स्मशानभूमीचा उपक्रम म्हणजे “पवित्र कार्य”; सर्वोच्च न्यायालयाकडून कौतुक

सर्वोच्च न्यायालयाने ईशा फाउंडेशनच्या कोयंबतूर येथील गॅसिफायर स्मशानभूमीला 'पवित्र कार्य' असे गौरवपूर्ण संबोधले. मद्रास उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने जमिनीच्या वादावर सामोपचाराने तोडगा काढण्याचा सल्ला दिला. ईशा फाउंडेशन २०१० पासून "Dignity in Death" अंतर्गत ३० स्मशानभूमी चालवते आणि गरजू कुटुंबांसाठी मोफत अंत्यसंस्कार सेवाही पुरवते.

ईशा संस्थेचा गॅसिफायर स्मशानभूमीचा उपक्रम म्हणजे “पवित्र कार्य”; सर्वोच्च न्यायालयाकडून कौतुक
High CourtImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Feb 26, 2026 | 6:10 PM
Share

सर्वोच्च न्यायालयात आज कोयंबतूर येथील ईशा योगा सेंटरमध्ये उभारलेल्या आधुनिक गॅस स्मशानभूमी संदर्भातील विशेष अनुमती याचिका (SLP) वर सुनावणी झाली. ही याचिका यापूर्वी मद्रास उच्च न्यायालयाने फेटाळली होती. सुनावणीदरम्यान माननीय सरन्यायाधीशांनी ईशाच्या सेवेचे “पवित्र कार्य” असे कौतुक केले. तसेच, याचिकाकर्त्यास पर्यायी जमीन देण्याबाबत दोन्ही पक्षांनी सामंजस्याने तोडगा काढावा, असा सल्ला न्यायालयाने दिला.

याचिकाकर्त्याने यापूर्वीच आपल्या जमिनीचा काही भाग ईशाला विकला आहे. उर्वरित शेजारील जमिनीबाबत दोन्ही पक्षांनी चर्चा करून मैत्रीपूर्ण तोडगा काढावा, असे न्यायालयाने सुचवले. दोन्ही बाजूंनी हे मान्य केले असून, चर्चेद्वारे प्रकरण निकाली काढण्यास सहमती दर्शवली आहे. यासाठी मद्रास उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती राजेंद्रन यांची मध्यस्थ म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

मद्रास कोर्ट काय म्हणाले होते?

ईशाने उभारलेल्या आधुनिक गॅसिफायर स्मशानभूमीविरोधातील प्रकरण यापूर्वी मद्रास उच्च न्यायालयाने फेटाळताना म्हटले होते की, “याचिकाकर्त्यांकडे कोणतेही कायदेशीर आधार नाहीत. गॅसिफायर स्मशानभूमी योग्य पंचायत परवानगी घेऊन आणि नियमांनुसार बांधण्यात आली आहे. शिवाय, विशेषतः गॅस स्मशानभूमी समाजासाठी उपयुक्त असून, तिला जनहिताविरुद्ध म्हणता येणार नाही.”

ईशा फाऊंडेशनच्या आसपासच्या पाचहून अधिक ग्रामपंचायतींतील नागरिकांनी त्यांच्या परिसरात स्मशानभूमी उभारण्याची मागणी शासकीय अधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानंतर पंचायत परवानगी तसेच तमिळनाडू प्रदूषण नियंत्रण मंडळासह संबंधित शासकीय विभागांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून ईशा फाउंडेशनने आधुनिक गॅसिफायर स्मशानभूमी उभारली.

2010 पासून कार्य

ईशा फाउंडेशन 2010 पासून तमिळनाडूमधील विविध भागांत “Dignity in Death” या उदात्त उद्देशाने स्मशानभूमी चालवत आणि देखभाल करत आहे. सध्या चेन्नई (बेसंट नगर), कोयंबतूर, नेयवेली, वेल्लोर आणि तंजावूर आदी ठिकाणी मिळून 30 स्मशानभूमींचे व्यवस्थापन ईशा करते.

या स्मशानभूमींमध्ये शांत, हिरवेगार आणि उद्यानासारखे वातावरण निर्माण केले जाते. परिसरात झाडे लावणे व त्यांची देखभाल, योग्य पादचारी मार्ग, स्वच्छ स्नानगृहे व शौचालयांची सुविधा, तसेच पर्यावरणीय हानी टाळण्यासाठी शासनाच्या सहकार्याने उत्तम पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. हे सर्व कार्य ईशा व्यावसायिक हेतू न ठेवता सेवाभावाने करत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय, मागील डिसेंबरमध्ये ईशाने तमिळनाडू सरकारच्या सहकार्याने दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांसाठी ‘मोफत अंत्यसंस्कार सेवा’ योजना जाहीर केली, ज्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना आपल्या प्रियजनांचे अंत्यसंस्कार सन्मानाने आणि आर्थिक ओझ्याविना करता येतील.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...