Chhattisgad Family Death : छत्तीसगडमध्ये दोन मुलांसह पती-पत्नीचा संशयास्पद मृत्यू, लॉजमध्ये आढळले मृतदेह, हत्या की आत्महत्या ?

| Updated on: May 06, 2022 | 4:44 PM

कांकेरच्या बसस्थानकाजवळील बस्तर लॉजमध्ये हे पती-पत्नी आपल्या दोन मुलांसह आले होते. बुधवारी दोघांनी रूम बुक केली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पती-पत्नी रात्री खोलीत जाताना दिसत आहेत. मात्र खोलीतून कोणीही बाहेर पडताना दिसत नाही. गुरुवारी सकाळपासून दुपारपर्यंत खोलीतून काहीच हालचाल न झाल्याने लॉजचालकाने पोलिसांना माहिती दिली.

Chhattisgad Family Death : छत्तीसगडमध्ये दोन मुलांसह पती-पत्नीचा संशयास्पद मृत्यू, लॉजमध्ये आढळले मृतदेह, हत्या की आत्महत्या ?
लॉकडाऊनमध्ये चोऱ्या वाढल्या.
Image Credit source: tv9
Follow us on

कांकेर : छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यातील एका लॉजमध्ये पती-पत्नी आणि दोन मुलांचा संशयास्पद मृतदेह (Suspicious Deadbody) आढळल्याने खळबळ माजली आहे. मुलांच्या तोंडातून फेस येत होता. तर पती-पत्नीचे मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. पती-पत्नीचे मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत हात मागून बांधलेले होते. यामुळे ही आत्महत्या (Suicide) नसून हत्या (Murder) असल्याचा संशय बळावला आहे. पोलीस फॉरेन्सिक टीमच्या मदतीने घटनेचा तपास करत आहेत. हत्या आणि आत्महत्या या दोन्ही बाजूंनी पोलीस तपास करत आहेत. मयत कुटुंब रायपूर जिल्ह्यातील रायपुरा येथील रहिवासी आहेत. (Suspicious death of husband and wife with two children in Chhattisgarh, bodies found in lodge)

रुममधून काही हालचाली न आल्याने लॉजमालकाने पोलिसांना बोलावले

न्यूज 18 हिंदीने दिलेल्या माहितीनुसार, कांकेरच्या बसस्थानकाजवळील बस्तर लॉजमध्ये हे पती-पत्नी आपल्या दोन मुलांसह आले होते. बुधवारी दोघांनी रूम बुक केली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पती-पत्नी रात्री खोलीत जाताना दिसत आहेत. मात्र खोलीतून कोणीही बाहेर पडताना दिसत नाही. गुरुवारी सकाळपासून दुपारपर्यंत खोलीतून काहीच हालचाल न झाल्याने लॉजचालकाने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी प्रथम दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा तोडून आत प्रवेश केला. आत पती-पत्नीचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळले आणि 2 मुलेही मृतावस्थेत आढळून आली.

आधी मुलांना विष पाजले मग पती-पत्नीने आत्महत्या केली

कांकेरच्या कोतवाली पोलिस स्टेशन हद्दीतील बस स्टँडवर असलेल्या बस्तर लॉजमध्ये ही घटना घडली आहे. रायपूरचे रहिवासी जितेंद्र देवांगन आपली पत्नी सविता आणि दोन मुलांसह येथे आले होते. पोलीस प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. आधी मुलांना विष पाजले, त्यानंतर पती-पत्नीने गळफास लावून घेतला, मात्र पती-पत्नीचे हात मागून बांधलेले असल्याने हत्येची भीती व्यक्त होत आहे. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. रायपूरमध्ये मृतांच्या कुटुंबीयांशी संबंधित लोकांनाही माहिती देण्यात आली आहे. फॉरेन्सिक टीमच्या मदतीने तपास सुरू आहे, असे कांकेरचे एसपी शलभ सिन्हा यांनी सांगितले. (Suspicious death of husband and wife with two children in Chhattisgarh, bodies found in lodge)

हे सुद्धा वाचा