Swachhata Campaign 5 : कचऱ्यातून धनवर्षा! सरकारने तीन हफ्त्यात कमावले 387 कोटी, केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितली यशोगाथा

Swachhata Campaign 5 : स्वच्छता अभियानातून सरकारने 387 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 2 ते 31 ऑक्टोबर दरम्यान हे अभियान राबविण्यात आले. केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी याविषयीची माहिती दिली. कशी झाली सरकारीची माहिती, जाणून घ्या...

Swachhata Campaign 5 : कचऱ्यातून धनवर्षा! सरकारने तीन हफ्त्यात कमावले 387 कोटी, केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितली यशोगाथा
सरकारची मोठी कमाई
| Updated on: Oct 29, 2025 | 10:54 AM

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी भारतातील स्वच्छता अभियानातून सरकारने 387 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 2 ते 31 ऑक्टोबर दरम्यान हे अभियान राबविण्यात आले. गेल्या ती आठवड्यातील हा आकडा आहे. तर चौथ्या आठवड्यात कमाईचा आकडा जवळपास 10,000 कोटी रुपयांच्या घरात पोहचण्याची शक्यता आहे. याशिवाय, आतापर्यंत स्वच्छतेच्या माध्यमातून आतापर्यंत 148 लाख चौरस फुट जागा मोकळी करण्यात आली आहे.

जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, ‘कचरे से धन’ या खास विशेष स्वच्छता अभियानातून कमाईचा सेतू साधण्यात आला. मंत्रालय आणि राज्य सरकारला याविशेषच्या सूचना आणि निर्देश देण्यात आले. या अभियानात सार्वजनिक ठिकाणीवरील कचऱ्याचे ढीग साफ करण्यात आला. कचऱ्याचे ढीग स्वच्छ करण्यात आले. दिल्ली, मुंबई आणि कोलकत्तासारख्या महानगरांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आले. यामध्ये हजारो स्वयंसेवकांनी भाग घेतला.

वेस्ट-टू-वेल्थ मॉडलवर आधारीत अभियान

या वर्षी ‘कचरे से धन’ अभियानाचा पुढील टप्पा राबविण्यात आला. कचऱ्याचा पुनर्उपयोग, पुनर्वापरावर भर देण्यात आला. वेस्ट-टू-वेल्थ मॉडलवर आधारीत अभियानावर सरकारने जोर दिला. हे अभियान केवळ पर्यावरण संरक्षणच नाही तर रोजगार निर्मितीसाठी पण खास ठरले. तर अनेक हातांनी कचरा हटवण्यासाठी योगदान दिले.


काय आहे स्वच्छता अभियान 5.0?

स्वच्छता अभियान 5.0 हे एक खास अभियान आहे. केंद्र सरकारद्वारे हे एक महत्त्वपूर्ण स्वच्छता आणि प्रशासकीय सुधारणा अभियान आहे. स्वच्छ भारत मिशनचा हा एक भाग आहे. महात्मा गांधी यांच्या स्वच्छतेचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी 2014 पासून हे अभियान राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा हा पाचवा टप्पा आहे. सरकारी कार्यालये, रेल्वे स्टेशन,सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम, कचरा व्यवस्थापन आणि जनजागरुकता आणण्यासाठी हे अभियान राबविल्या जाते. या अभियानाचा मुख्य उद्देश सरकारी कार्यालये, स्टेशन, ट्रेन यामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे, कचरा व्यवस्थापनाची सवय लावणे यासाठी हे अभियान सातत्याने राबवत आहे. . 2 ते 31 ऑक्टोबर दरम्यान हे अभियान राबविण्यात आले. स्वच्छता अभियानातून सरकारने 387 कोटी रुपयांची कमाई केली आहे.