Explained: पितळाच्या भावात सोने! या ठिकाणी दडलाय तो 2 कोटी टन साठा, समुद्र मंथनाशिवाय नाही पर्याय, काय आहे ती आनंदवार्ता
Gold Mines : सोन्याच्या किंमतीत यंदा 56% वाढ दिसली. तरीही सोन्याची मागणी गेल्या 14 वर्षांतील उच्चांकावर पोहचली आहे. मागणी इतका पुरवठा होत नसल्याने सोन्याने रॉकेट भरारी घेतली आहे. या ठिकाणी 2 कोटी सोनं दडलंय. ते जर बाहेर आले तर सोन्याचे भाव गडगडतील

सोन्याच्या किंमतींनी यंदा सर्वसामान्यांना कापरे भरले. अनेक जण सराफा बाजाराचा रस्ताच विसरले आहेत. सोन्याच्या किंमतींनी रॉकेट भरारी घेतली आहे. यंदा सोने 50% हून अधिकने महागले आहे या दरम्यान सोन्याने 40 पेक्षा अधिक वेळा ऑल टाईम हाय लेवल गाठली. सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत पहिल्यांदा 4,300 डॉलर प्रति औंसवर पोहचली. गोल्डमॅन सॅशच्या दाव्यानुसार, डिसेंबर 2026 पर्यंत सोन्याची किंमत 4,900 डॉलर प्रति औंसवर पोहचू शकते. सोन्याच्या किंमतीत वाढीमागे अनेक कारणे आहेत. सर्वात मोठे कारण म्हणजे या तेजीला मागणीची फोडणी बसली आहे. गेल्या 14 वर्षांत पहिल्यांदाच मागणीला जोर आला आहे. एका अंदाजानुसार जगात आतापर्यंत केवळ 208,874 टन सोने खाणीतून बाहेर काढण्यात आले आहे. पण समुद्राच्या तळाशी अजून जवळपास 2 कोटी सोने दडलेलं आहे. जर हे सोने बाहेर आणता आले तर सोन्याला पितळाचा भाव येईल. सोने स्वस्त होईल. जगाला इतर ठिकाणी गुंतवणुकीचा चांगला पर्याय मिळेल. सोन्यावरील अवलंबित्व कमी होईल. ...
