पाकिस्तानसाठी वाईट बातमी, भारताला मिळणार छोटू, स्वीडनचा मोठा निर्णय

आता स्वीडनची साब कंपनी भारताला एक घातक अस्त्र देणार आहे. पाकिस्तानसाठी ही वाईट बातमी आहे. कारण यामुळे भारताची ताकद अजून वाढेल त्याशिवाय आत्मनिर्भर भारताचा उपक्रम यामुळे अजून मजबूत होईल.

पाकिस्तानसाठी वाईट बातमी, भारताला मिळणार छोटू, स्वीडनचा मोठा निर्णय
nimbrix anti drone missiles
| Updated on: Oct 03, 2025 | 10:00 AM

रशिया-युक्रेन युद्ध असो वा इस्रायल-इराण वॉरपहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं. दोन देशांमध्ये युद्धाची पद्धत तीच आहे, पण आता शस्त्र बदलली आहेत. युद्धाच्या रणांगणात आता मोठे रणगाडे, विमानं नाही, तर छोटे-छोट ड्रोन उडताना दिसतात. हे छोटे ड्रोन्स आता युद्धाची मोठी शस्त्र बनली आहेत. कधी काळा कॅमेऱ्याद्वारे टेहळणी करणारे ड्रोन्स आता बॉम्ब आणि शस्त्र घेऊन सैन्य तळांवर पोहोचत आहेत. याची खास बाब म्हणजे ड्रोन स्वस्त असतात. सहज बनवता येऊ शकतात. ही ड्रोन्स झुंडीने हल्ला करण्यास सक्षम आहेत. शत्रुच्या हवाई सुरक्षा प्रणालीला चकवा देण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे.

ड्रोनचा सामना करण्यासाठी आधीपासून अनेक शस्त्र उपलब्ध आहेत. काही ठिकाणी ड्रोन पाडण्यासाठी लेझरचा वापर केला जातो. काही ठिकाणी रेडिओ जॅमरने सिग्नल कापला जातो. पण, तरीही ड्रोन्सचा छोटा आकार, झुंडीने एकत्र येणं आणि वेग यामुळे हे खतरनाक शस्त्र आहे. ही आव्हानं लक्षात घेऊन स्वीडनची संरक्षण कंपनी (Saab) साबने 2024 साली एक मिसाइल लॉन्च केलं. त्या मिसाइलच नाव आहे, निंब्रिक्स (Nimbrix). छोटे ड्रोन आणि झुंडीने येणाऱ्या ड्रोन्सचा सामना करण्यासाठी खास ही मिसाइल बनवण्यात आली आहे. साब कंपनीची ही पहिली अशी मिसाईल आहे. साबनुसार, कमी खर्चात ही मिसाइल बनवण्यात आली आहे. अत्यंत सहजतेने या मिसाइलची तैनाती करता येते. जास्त खर्चाशिवाय सैन्य ड्रोन संकटावर मात करु शकतं.

फायर-एंड-फॉरगेट

सैनिक अत्यंत सहजपणे हे मिसाइल आपल्यासोबत घेऊन जाऊ शकतात. याला ट्रायपॉडवर किंवा कुठल्या गाडीवर फिट करता येतं. आवश्यकता पडल्यास स्थायी ठिकाणांवर सुद्धा निंब्रिक्स मिसाइल फिक्स करता येते. ‘फायर-एंड-फॉरगेट’ अशी या मिसाइलची टेक्नेलॉजी आहे. म्हणजे एकदा हे मिसाइल डागल्यानंतर आपणहून सर्व करतं, त्याला नियंत्रित करण्याची आवश्यकता नाही. यात एक्टिव इंफ्रारेड सीकर आहे, त्या द्वारे लक्ष्याला ओळखून ट्रॅक करता येतं. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी भारताने पाकिस्तानची अनेक ड्रोन्स पाडली होती. आता निंब्रिक्सच्या येण्याने भारताची ताकद आणखी वाढेल.

म्हणून ड्रोनच्या झुंडीसाठी हे खास शस्त्र

निंब्रिक्समध्ये 40 मिमीच खास एअर-बर्स्ट वॉरहेड आहे. शत्रुच्या ड्रोनजवळ जाऊन त्याचा स्फोट होतो. वेगवेगळ्या दिशांना तुकडे विखुरले जातात. समोरुन ड्रोनची झुंड येत असेल, तर एकाचवेळी हे सर्व ड्रोन्स पाडता येतात. म्हणून ड्रोनच्या झुंडीसाठी हे खास शस्त्र आहे.

भारतात लोकल प्रोडक्शन

स्वीडीश संरक्षण कंपनी Saab ने हे खास अँटी ड्रोन मिसाइल निम्ब्रिक्स भारतात लोकल प्रोडक्शनसह सादर करण्याची घोषणा केली आहे. अवघी 2 ते 5 किलोमीटर रेंज असलेलं हे मिसाइल ड्रोनच्या झुंडीला नष्ट करण्यासाठी बनवण्यात आलय. आत्मनिर्भर भारताचा उपक्रम यामुळे अजून मजबूत होईल. निम्ब्रिक्स सारख्या छोट्या ड्रोन्समुळे ब्रह्मोस आणि अग्निV सारख्या महागड्या मिसाइल्सवरील अवलंबित्व कमी होईल.