AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतात कुठे कुठे हल्ले करण्याचा डाव होता? तहव्वूर राणाला देशभर फिरवणार? एनआयएकडून कोठडी मागण्याचं कारण आलं समोर

२६/११ मुंबई हल्ल्यातील मास्टरमाईंड तहव्वूर राणाची भारतात हजर करण्यात आली आहे. एनआयएने त्याला १८ दिवसांची कोठडी मिळवली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. एनआयएने दावा केला आहे की राणाने मुंबईसह देशातील इतर शहरात करण्याचा कट रचला होता.

भारतात कुठे कुठे हल्ले करण्याचा डाव होता? तहव्वूर राणाला देशभर फिरवणार? एनआयएकडून कोठडी मागण्याचं कारण आलं समोर
Tahawwur Rana (1)
| Updated on: Apr 11, 2025 | 6:21 PM
Share

मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड असलेल्या तहव्वूर राणाला अखेर भारतात आणण्यात आलं. एनआयएचे आयजी बत्रांच्या नेतृत्वात विशेष पथकाने तब्बल १७ वर्षांनी तहव्वूर राणाला भारतात आणले. तहव्वूर राणाला 18 दिवसांची NIA कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) कडून त्याची कसून चौकशी सुरु आहे. त्यातच आता राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) गुरुवारी दिल्लीतील न्यायालयात तहव्वूर राणाबद्दल धक्कादायक खुलासा केला. 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाने मुंबईप्रमाणे भारतातील इतर शहरात दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचला होता, असा संशय राष्ट्रीय तपास संस्थेने व्यक्त केला आहे.

तहव्वूर राणाला भारतात आणल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. यानंतर न्यायालयात राष्ट्रीय तपास संस्थेकडून त्याची कोठडी मिळवण्यासाठी युक्तीवाद करण्यात आला. यावेळी एनआयएने न्यायालयात सांगितले की, तहव्वूर राणाची कसून चौकशी करणे आवश्यक आहे. १७ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनांची तपासणी करण्यासाठी त्याला विविध ठिकाणी घेऊन जाण्याची गरज आहे. हा कट त्याने कसा रचला? या कटाच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी आणि दहशतवादी नेटवर्कचा पर्दाफाश करण्यासाठी तहव्वूर राणाला NIA कोठडी मिळावी, हे आवश्यक आहे.

हल्ल्यांसाठी ‘मुंबई मॉडेल’चा वापर

NIA तहव्वूर राणाला देशाच्या वेगवेगळ्या भागात नेण्याची शक्यता आहे. तहव्वूर राणाच्या कोठडीच्या मागणीचे हे एक मुख्य कारण होते. 2008 मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या धर्तीवर भारतातील इतर शहरांमध्येही हल्ले करण्याचा कट होता का? याबद्दल एनआयएला जाणून घ्यायचे आहे. या हल्ल्यांसाठी ‘मुंबई मॉडेल’चा वापर करण्यात आला होता का, याचा तपास एनआयए करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर 2008 मध्ये तहव्वूर राणाने आग्रा, दिल्ली, अहमदाबाद आणि मुंबई या प्रमुख शहरांना भेटी दिल्या होत्या.

इतर शहरात दहशतवादी हल्ला करण्याचा कट

तसेच तहव्वूर राणाने मुंबईप्रमाणे भारतातील इतर शहरात दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचला होता, असा संशय आम्हाला आहे, त्याचीही चौकशी करायची आहे, असेही राष्ट्रीय तपास संस्थेने सांगितले. यानंतर कोर्टाने तहव्वूर राणाला 18 दिवसांची NIA कोठडी सुनावली. मात्र यावेळी न्यायाधीशांनी राणासाठी काही निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार, त्याची दर २४ तासांनी वैद्यकीय तपासणी केली जाईल.

दोन दिवसातून एकदा वकिलाला भेटण्याची परवानगी

तसेच, त्याला दोन दिवसातून एकदा त्याच्या वकिलाला भेटण्याची परवानगी असेल. मात्र, वकील आणि राणा यांच्या भेटीदरम्यान एनआयएचे अधिकारी उपस्थित राहतील. त्या दोघांमध्ये विशिष्ट अंतर असेल. याशिवाय, तहव्वूर राणाला केवळ ‘सॉफ्ट-टिप’ पेन वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.