थलपती विजय यांच्या बहुमत चाचणीनंतर तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप, थेट जयललिता यांच्या पक्षात..
Thalapathi Vijay : तामिळनाडूमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. नुकताच मुख्यमंत्री थलपती विजय यांनी बहुमत सिद्ध केले. त्यांच्या सरकारने बहुमत चाचणी पार केली. मात्र, यादरम्यान मोठा भूंकप राजकारणात आला.

तामिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री सी.जोसेफ विजय ऊर्फ थलपती विजय यांनी बहुमत सिद्ध केले. बहुमत चाचणीत त्यांच्या सरकारला 144 आमदारांचे समर्थन मिळाले. दुसरीकडे विरोधी पक्षाला फक्त 22 मत मिळाली. यादरम्यान एआयएडीएमके पक्षात मोठी फूट दिसली. या बहुमत चाचणीकरिता पक्षाने बहिष्कार टाकल्यानंतरही तब्बल 1-2 नव्हे तर तब्बल 25 आमदारांनी थलपती विजय यांच्या समर्थनार्थ मतदान केले. आता तामिळनाडूमध्ये तिसऱ्या नंबरवर एआयएडीएमके पोहोचला. एआयएडीएमके पक्षाचे तुकडे पडताना दिसली. हा मोठा धक्का म्हणावा लागेल. समस्या ही आहे की, एआयएडीएमके नेते एडप्पाडी के. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वावर बंडखोर आमदारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. या वादात थेट थलपती विजय यांचा फायदा झाला. मोठ्या संख्येने आमदाराच्या एका गटाने थलपती विजय यांना सपोर्ट केला. ज्याने थलपती विजय बहुमत स्पष्ट करू शकले.
थलपती विजय निवडणुकीच्या प्रचारादरम्यान थेट त्याची लढाई ही डीएमके नेते एमके स्टालिन यांच्यासोबत असल्याचे अनेकदा सांगताना दिसले. ज्यानंतर एमके यांना थलपती विजय यांनी थेट सत्तेतून बाहेर फेकले. ही वस्थुस्थिती खरी आहे पण थलपती विजय यांच्या पक्षाचा सर्वात मोठा फटका एआयएडीएमकेला बसला. त्यांच्या पक्षातील आमदारांची बंडखोरी वाढली आहे आणि हीच खरी डोकेदुखी ठरत आहे.
एआयएडीएमके पक्षाचे दोन विभागात विभाजन झाले. त्याचाच फायदा थलपती विजय यांना बहुमत सिद्ध करताना झाला. पुढील काळात तामिळनाडूच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसतील. मात्र, या विधानसभा निवडणुकीनंतर एआयएडीएमके पक्षाला मोठा धक्का बसताना दिसत आहे. पक्षातील फुटीचा थेटपणे फायदा थलपती विजय यांना आज झाला. एका मोठ्या गटाने त्यांना समर्थन केले.
थलपती विजय यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी काही मोठे आश्वासने जनतेला दिली. त्यानंतर जनतेने त्यांना भरघोष मतदान केले. बहुमताचा आकडा मिळवण्याकरिता अगदी जवळ असताना त्यांना एआयएडीएमकेमधील आमदार फोडण्यात यश मिळाले. आता एआयएडीएमके पक्षातील बंडखोरी हा मोठा विषय ठरलाय. मुख्यमंत्रिपदाची सुत्रे हातात येताच थलपती विजय यांनी दारूच्या दुकानांबद्दल अत्यंत मोठा निर्णय घेतला.