AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थलपती विजय यांचे सरकार धोक्यात, बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच थेट धक्का, ऐनवेळी..

Thalapathi Vijay Floor Test : तामिळनाडूच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यामध्येच बहुमत सिद्ध करण्यापूर्वीट थलपती विजय यांना मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय. मोठा निर्णय विरोधी पक्षाने घेतला.

थलपती विजय यांचे सरकार धोक्यात, बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच थेट धक्का, ऐनवेळी..
Thalapathy Vijay
| Updated on: May 13, 2026 | 12:00 PM
Share

अभिनेते आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय तूफान प्रसिद्धीत आहेत. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाची स्थापना करून धमाकेदार कामगिरी निवडणुकीत थलपती विजय यांनी केली. विशेष म्हणजे थेट तामिळनाडू राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथही घेतली. कोणीही विचार केला नाही असा मोठा विजय या निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा झाला. थलपती विजय यांच्या नव्या सरकारसाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. आज त्यांच्या सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. थलपती विजय विधानसभेत बहुमत सिद्ध करतील. विजय यांच्या टीव्हीके पक्षाने राज्य विधानसभेत 107  जागा जिंकल्या. ज्यानंतर त्यांना काँग्रेस, डावे पक्षांची साथ मिळाली. यांच्यामुळे थलपती विजय यांना सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली. थलपती विजय यांनी तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांच्याकडे 120 हून अधिक आमदारांची यादी सादर केली.

तामिळनाडूतील दुसरा सर्वात मोठा पक्ष असलेला एआयएडीएमकेमध्ये मोठी फूट पडली. एका गटाने थलपती विजय यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे थलपती विजय अगदी सहजपणे बहुमताचा आकडा पार करतील, असा अंदाज आहे. मात्र, त्यापूर्वीच मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळत आहे. तामिळनाडू विधानसभेत टीव्हीके सरकारच्या विश्वासदर्शक ठरावासंदर्भात एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे.

विरोधी पक्ष डीएमकेने या मतदान प्रक्रियेवरच बहिष्कार टाकण्याचा मोठा निर्णय घेतला. हेच नाही तर त्यांनी सभागृहातून सभात्याग करण्याचा निर्णय घेतला. डीएमके नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी सभागृहात सांगितले की, आमचा पक्ष श्वासदर्शक ठरावात सहभागी होणार नाही, या प्रक्रियेत आमचा पक्ष तटस्थ भूमिकेत राहिल. यासोबतच त्यांनी एका मोठा आरोप देखील केला.

उदयनिधी स्टॅलिन यांनी म्हटले की, ज्यांनी सत्ताधारी पक्षाला मतदान केले, त्यांच्या लक्षात आले की, त्यांनी मोठी चूक केली. ज्यामुळे तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच थलपती विजय यांना हा मोठा धक्का म्हणावा लागेल. उदयनिधी स्टॅलिन यांनी स्पष्ट केले की, या मतदान प्रक्रियेत त्यांचा पक्ष सहभागी नसेल आणि या प्रक्रियेदरम्यान त्यांचा पक्ष सभागृहात नसेलही. ज्यामुळे आता तामिळनाडूच्या राजकारणातील घडामोडींना प्रचंड वेग आला.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?