AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tamil Nadu election results 2026: तमिळनाडूमध्ये थलपती विजयचा पक्ष ठरतोय नंबर 1

Tamil Nadu election results 2026: तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत प्रस्थापितांना मोठा धक्का बसताना दिसून येत आहे. कारण अभिनेता थलपती विजय यांचा पक्ष सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडीवर आहे.

Tamil Nadu election results 2026: तमिळनाडूमध्ये थलपती विजयचा पक्ष ठरतोय नंबर 1
तमिळनाडू विधानसभा निवडणूक निकाल 2026Image Credit source: Instagram
| Updated on: May 04, 2026 | 10:13 AM
Share

पश्चिम बंगालमधील लढतींसह आसाम, तमिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी इथल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. तमिळनाडूमध्ये सत्ताधारी डीएमकेसह आघाडीला सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळण्याचे अंदाज मतदानोत्तर चाचण्यांमधून व्यक्त झालं होतं. मात्र अभिनेता थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षामुळे यंदाची लढाई तिहेरी आणि तितकीच चुरशीची झाली आहे. पदार्पणातच टीव्हीकेची कामगिरी दमदार असल्याचं पहायला मिळतंय. सुरुवातीच्या कलांनुसार विजय यांचा पक्ष 102 जागांवर आघाडीवर आहे. तर डीएमके 54 आणि एआयएडीएमके 70 जागांवर आघाडीवर आहे.

तमिळनाडू विधानसभेच्या 234 जागांसाठी मतदान पार पडलं होतं. या निवडणुकीत मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी डीएमके-काँग्रेस आघाडी सत्ता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. तर एआयएडीएमके-भाजप आघाडी तमिळनाडूवर नियंत्रण मिळवण्याचं लक्ष्य ठेवत आहे. या लढतीत अभिनेते आणि राजकारणी विजय आणि त्यांचा पक्ष टीव्हीकेनं सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे.

तमिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी एकूण 234 जागांपैकी 118 जागांचा जादुई आकडा आहे. द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडी 164 मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवत आहे, तर त्यांचा मित्रपक्ष काँग्रेस 28 जागांवर आहे. दुसरीकडे एआयएडीएमके 167 जागांवर, भाजप 27, पीएमके 18 जागांवर निवडणूक लढवत आहे. टीटीव्ही दिनकरन यांच्या एएमएमकेला 11 जागा देण्यात आल्या आहेत. तमिळनाडूच्या राजकारणात थलपती विजय यांचा हा प्रवेश अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. विजय यांनी 2024 मध्ये ‘तमिळगा वेत्री कळघम’ या पक्षाची स्थापना केली. त्यानंतर पहिल्यांदाच ते निवडणूक लढवत आहेत. विजय हे स्वत: पेरांबूर आणि तिरुचिरापल्ली पूर्व या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

थलपती विजय हे तमिळ सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेते आहेत. परंतु राजकारणात आल्यानंतर त्यांनी चित्रपटांमध्ये काम करणं सोडून देणार असल्याचं जाहीर केलं. तमिळनाडूच्या लोकांना भ्रष्टाचार, जातीभेद, धर्मभेदमुक्त कार्यक्षम प्रशान हवं आहे आणि त्यासाठीच आपण प्रयत्न करणार आहोत, असं आश्वासन विजय यांनी जनतेला दिलं होतं.

एकीकडे टीव्हीके आघाडीवर असतानाच तमिळनाडूमधील राजकीय हालचालींनी आतापासूनच वेग घेतला आहे. भाजपाने थलपती विजय यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. तमिळनाडू भाजपच्या उपाध्यक्ष खुशबू सुंदर यांनी एआयडीएमकेच्या नेतृत्त्वाखालील आघाडी बहुमताच्या जवळ पोहोचल्यास विजय यांनी एनडीएमध्ये सहभागी होण्यासाठी पक्षाचे दरवाजे खुले आहेत, असं स्पष्ट केलं.

Follow Us
निंबाळकरांसाठी 84 सभा अन् मीदेखील तीन दिवस तिथेच... संजय राऊतांनी
निंबाळकरांसाठी 84 सभा अन् मीदेखील तीन दिवस तिथेच... संजय राऊतांनी सांगितली 2024 मधील ती गोष्ट
कसलं ऑपरेशन टायगर? घंटा! ते खासदार घंटा...; राऊतांनी उडवली खिल्ली
Sanjay Raut | कसलं ऑपरेशन टायगर? घंटा! ते खासदार घंटा वाजवत बसतील; राऊतांनी उडवली खिल्ली
20 वर्षांचा न्यायाचा संघर्ष! पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज निकाल
Omraje Nimbalkar | 20 वर्षांचा न्यायाचा संघर्ष! पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज मोठा निकाल; ओमराजे मुंबईच्या दिशेने रवाना
अखेर फोटो समोर आला! ऑपरेशन टायगरमधील बंडखोर खासदार कुठे आहेत?
मोठी बातमी! अखेर फोटो समोर आला! ऑपरेशन टायगरमधील बंडखोर खासदार कुठे आहेत?, फोटोमधून झाला खुलासा
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान
Eknath Shinde | हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान, ऑपरेशन तुडवावर जोरदार पलटवार
माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार...
Uddhav Thackeray | माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार; ठाकरेंचे मोठे विधान
ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
Uddhav Thackeray On Operation Kamal | ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले...
Uddhav Thackeray | आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले....
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल