
अभिनेता आणि तमिळगा वेत्री कझगम (टीव्हीके) चे प्रमुख थलापती विजय यांच्या रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीत 30 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूच्या करूर येथे घडलेल्या या घटनेत अनेकजण जखमी झाले आहेत, त्यांना उपचारासाठी रुग्नालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे लोकांना प्रश्न पडला आहे की थलापती वियय कोण आहे? त्याने या रॅलीचे आयोजन का केले होते? त्याने पक्ष कधी स्थापन केला होता? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात.
थलापती विजय हा दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आहे. तो एक अभिनेता असण्यासोबतच तो एक राजकारणी देखील आहे. विजयने 1992 मध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. तेव्हापासून त्याने अनेक हिट चित्रपट दिले असून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. कालांतराने त्याने राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आणि आता आपल्या पक्षाच्या रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीत 30 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.
थलापती विजय यांनी आपल्या तमिलगा वेत्री कझगम (टीव्हीके) या पक्षाची स्थापना 2 फेब्रुवारी 2024 रोजी केली होती. याच पक्षातून त्याने राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. या पक्षाचे मुख्यालय चेन्नईमध्ये आहे. विजयने तामिळनाडूतील सत्ताधारी द्रमुक, मुख्यमंत्री स्टॅलिन आणि भाजपाविरुद्ध आक्रमक भूमिका घेत पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने आतापासूनच प्रचाराला सुरुवात केली असून आजच्या रॅलीत अपघात झाला आहे.
थलापती विजय हा दक्षिण भारतात खुप लोकप्रिय आहे. एका अहवालानुसार विजयची एकूण संपत्ती 600 कोटी रुपये आहे. चेन्नईमधील विजयचा नीलंकराई बंगला ही एक बहुचर्चित मालमत्ता आहे. समुद्रकिनारी असलेला हा बंगला हॉलिवूड स्टार टॉम क्रूझच्या समुद्रकिनाऱ्यावरील घरापासून प्रेरणा घेऊन बनवलेला आहे. तसेच त्याच्याकडे इतरही संपत्ती आहे. विजयकडे अनेक लक्झरी कार आहेत. यात रॉल्स-रॉइस घोस्ट, बीएमडब्ल्यू एक्स5 आणि एक्स6, ऑडी ए8 एल, रेंज रोव्हर इव्होक, फोर्ड मस्टँग, व्होल्वो एक्ससी90 आणि मर्सिडीज-बेंझ यांचा समावेश आहे.