आणखी एका राज्यातील सरकार कोसळणार? आमदारांना 70 कोटींची ऑफर? मुख्यमंत्र्यांनी तातडीने…काय घडतंय

क्षात पहिल्यांदा आमदार झालेल्यांचे भविष्य उज्ज्वल आहे. घाई-गडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. कोणाच्याही प्रलोभनांना बळी पडू नका, असेही थलापती विजय यांनी सांगितलेय.

आणखी एका राज्यातील सरकार कोसळणार? आमदारांना 70 कोटींची ऑफर? मुख्यमंत्र्यांनी तातडीने...काय घडतंय
thalapathy vijay tvk party
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 12, 2026 | 5:37 PM

Tamilnadu TVK Party : देशाच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. जम्मू-काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे 20 ते 25 आमदार नाराज असल्याचे बोलले जातेय. ओमर अब्दुल्ला यांचे सरकार कोसळते की काय? असा प्रश्न विचारला जातोय. असे असतानाच आता तामिळनाडूमधील थलापती विजय यांचेही सरकार मध्येच कोसळू शकते, असा दवा केला जातोय. विजय यांच्या टीव्हीके पक्षाच्या आमदारांना 60 ते 70 कोटी रुपयांपर्यंत पैशांचे प्रलोभन दिले जातोय, असेही सांगितले जातेय. याच पार्श्वभूमीवर थलापती विजय यांनी संभाव्य पक्षफुटी रोखण्यासाठी पावलं उचलण्यास सुरुवात केलीय.

तामिळनाडूमध्ये नेमकं काय घडतंय?

तामिळनाडूमध्ये टीव्हीकेच्या आमदारांना 60 ते 70 कोटी रुपयांची ऑफर दिली जातेय, असा दावा केला जातोय. पैशांचे प्रलोभन देऊन टीव्हीके पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातोय, असाही आरोप केला जातोय. डीएमके आणि एआयडीएमके पक्षाकडून हे कारस्थान रचले जातेय, असा दावा विजय यांच्या सरकारमधील मंत्री सीटी निर्मल कुमार यांनी केलाय. या प्रकरणात काही लोकांना अटक करण्यात आलीय. भाजपाच्या समर्थनात विजय यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे, असाही मोठा दावा सीटी निर्मल कुमार यांनी केलाय.

Loading...

दरम्यान, पक्षातील ही संभाव्य फूट रोखण्यासाठी थलापती विजय यांनी योग्य ती खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी डीएमकेच्या सर्व आमदारांची 11 नोव्हेंबर रोजी बैठक बोलावली. या बैठकीत थलापती विजय यांनी एका-एका आमदाराशी चर्चा केलीय. कोणाच्याही प्रलोभणांना बळी पडू नका. आपापल्या मतदारसंघात विकासकामांवर लक्ष केंद्रित करा, अशा सूचना विजय यांनी दिल्या आहेत.

सोबतच, पक्षात पहिल्यांदा आमदार झालेल्यांचे भविष्य उज्ज्वल आहे. घाई-गडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. कोणाच्याही प्रलोभनांना बळी पडू नका, असेही थलापती विजय यांनी सांगितलेय. दुसरीकडे टीव्हीकेच्या आमदारांत फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. उलट टीव्हीकेकडून एआयडीएमकेच्या आमदारांना स्वत:च्या पक्षात घेण्यासाठी प्रयत्न केला जातोय, असा दावा केलाय. त्यामुळे आता तामिळनाडूच्या राकारणात नेमके काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us