अलन मस्क यांनी या मुळ भारतीय व्यक्तीला बनवले नवा सीएफओ

ते आधी सोलरसिटी कॉर्पोरेशन कंपनीत फायनन्स आणि अकाउंटचा काम करत होते. मार्च २०१६ मध्ये तेसलाने कंपनी हातात घेतली. त्यानंतर वैभव तनेजा तेसलाचे कर्मचारी झाले.

अलन मस्क यांनी या मुळ भारतीय व्यक्तीला बनवले नवा सीएफओ
Govinda Hatwar | Updated on: Aug 07, 2023 | 10:20 PM

नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती भारतात गुंतवणूक करू शकतात. अलन मस्क यांनी भारतीय व्यक्तीच्या खांद्यावर महत्त्वाची धुरा सोपवली आहे. टेसलाने नव्या सीएफओ म्हणजे मुख्य आर्थिक अधिकारी म्हणून भारतीय मुळ व्यक्तीचा नियुक्ती केली आहे. विद्यमान जॅकरी किर्कहार्न यांना आपल्या पदावरून राजीनामा द्यावा लागला.

या भारतीय मुळ व्यक्तीचे नाव वैभव तनेजा असे आहे. तनेजा आता टेसलाच्या मुख्य आर्थिक अधिकारी म्हणून जबाबदारी पाहतील. टेसलाने शेअर बाजारात स्पष्ट केले की, वैभव तनेजा हे कंपनीच्या मुख्य आर्थिक बाबी पाहतील.

किर्कहार्न १३ वर्षे टेसलात

टेसलाचे मुख्य आर्थिक अधिकारी जॅकरी किर्कहार्न यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. सोमवारी बाजार सुरू झाल्यानंतर कंपनीने ४५ वर्षीय वैभव तनेजा यांना नवा सीएफओ बनवल्याची घोषणा केली. जॅकरी किर्कहार्न गेल्या चार वर्षांपासून टेसलाच्या मास्टर ऑफ कॉईन आणि फायनान्स चीफ म्हणून काम पाहिले. किर्कहार्न यांचा टेसलाचा करिअर १३ वर्षांचा राहिला आहे.

किर्कहार्न यांनी जाता जाता लिहिले की, टेसलामध्ये काम करणे एक वेगळा अनुभव आहे. कंपनीमध्ये मी जे काही काम केलं त्यावर मला गर्व आहे. येथील कर्मचाऱ्यांनी अशक्य असणारी कामं शक्य करून दाखवली.

तनेजा २०१६ पासून टेसलासोबत

जॅकरी किर्कहार्न यांची जागा घेणारे भारतीय मुळ असलेले वैभव तनेजा टेसलासोबत २०१६ पासून काम करत आहेत. ते आधी सोलरसिटी कॉर्पोरेशन कंपनीत फायनन्स आणि अकाउंटचा काम करत होते. मार्च २०१६ मध्ये तेसलाने कंपनी हातात घेतली. त्यानंतर वैभव तनेजा टेसलाचे कर्मचारी झाले.

२०१७ साली कंपनीने त्यांना प्रमोट करून असिस्टंट कॉर्पोरेटर कंट्रोलर बनवले. मे २०१८ मध्ये कॉर्पोरेटर कंट्रोलन झाले. मार्च २०१९ पासून वैभव तनेजा हे मुख्य अकाउंटिंग अधिकारी आहेत. यापूर्वी तनेजा प्राईस वॉटर हाऊस कुपर्सचे कर्मचारी होते.

Follow Us