
स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी अनेक स्वातंत्र्य सैनिक, क्रांतीकारक, महापुरुषांचं स्मरण केलं जातं. स्वातंत्र्यातील त्यांच्या योगदानांवर चर्चा केली जाते. स्वातंत्र्याच्या आंदोलनात तरुणांनी आणि विद्यार्थ्यांनी कसा भाग घेतला, महिला कशा पदर खोवून रस्त्यावर उतरल्या याचा इतिहास सांगितला जातो. पण हा इतिहास सांगताना अनेकजण एक महत्त्वाचा इतिहास विसरून जातात. तो इतिहास म्हणजे वेश्यांचा. देशातील अनेक वेश्याही स्वातंत्र्य चळवळीने भारावलेल्या होत्या. त्यांनीही आपल्या परीने स्वातंत्र्य चळवळीत मोठं योगदान दिलं आहे. या सर्व छोट्यामोठ्या हातांनी स्वातंत्र्य आंदोलनात योगदान दिल्यानेच देशाला स्वातंत्र्य मिळू शकलं. या सर्वांच्या बलिदानांमुळेच आज आपण मुक्ततेचा श्वास घेत आहे. स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या देहविक्रय करणाऱ्या या कोण महिला होत्या? त्याचाच घेतलेला हा आढावा. नर्गिस यांच्या आईने कोठा सोडला स्वातंत्र्य चळवळीच्या काळात उत्तर प्रदेशातील वाराणासीतील (बनारस) चौक परिसरातील प्रमुख बाजार दालमंडीच्या गल्ल्यांमधील कोठ्यांवर संगिताची मैफल सजायची. राजेश्वरबाई, जद्दन बाईपासून ते रसूलन बाईपर्यंत अनेक वेश्यांचा हा...