शिक्षक की राक्षस?, विचारले नसताना उत्तर दिले म्हणून विद्यार्थ्याचे तोडले दात

उदयपूरच्या कडलवास औद्योगिक क्षेत्रात माऊंट लिट्रा नावाची ही शाळा आहे. या विद्यार्थ्याचे वडील भरत नंदावत यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ही तक्रार केली आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की, त्यांचा 14 वर्षांचा मुलगा सम्यक नंदावत हा माऊंट लिट्रा शाळेत शिकतो. गुरुवारी त्याचे हिंदीचे शिक्षक कमलेश वैषणव हे वर्गात प्रश्न विचारीत होते. शिक्षकांनी दुसऱ्या एका मुलाला प्रश्न विचारला होता, मात्र सम्यक याने अनावधनाने त्या प्रश्नाचे उत्तर दिले. त्यामुळे शिक्षकांना एवढा राग आला की, त्यांनी सम्यकचे डोके टेबलावर आपटले.

शिक्षक की राक्षस?, विचारले नसताना उत्तर दिले म्हणून विद्यार्थ्याचे तोडले दात
शिक्षकाने तोडले विद्यार्थ्याचे दात
Follow us
| Updated on: Aug 19, 2022 | 3:30 PM

उदयपूर– शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मारहाणीचे प्रकार राजस्थानात (Rajasthan)थांबताना दिसत नाहीयेत. जालौरमध्ये (jalore)शिक्षकाने केलेल्या जबर मारहाणीत एका 9 वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता दुसरा प्रकार घडला आहे. उदयपूरमध्ये एका खासगी शाळेतील शिक्षकाने एका विद्यार्थ्याला एवढी जबर मारहाण केली आहे की, त्याचे दातच तुटले (teacher broke teeth)आहेत. या विद्यार्थ्याची चूक इतकीच होती ती, त्याने शिक्षकांनी दुसऱ्या मुलाला प्रश्न विचारलेला असताना, स्वत:च उत्तर दिले होते. त्यामुळे राग आलेल्या शिक्षकांनी या मुलाचे डोके टेबलावर आपटले. यात त्या मुलाचे दातच तुटले आहेत.

शिक्षकाविरोधात एफआयआर दाखल

यानंतर संतापलेल्या पालकांनी या शिक्षकाच्याविरोधात पोलिसांत एफआयआर दाखल केली आहे. उदयपूरच्या कडलवास औद्योगिक क्षेत्रात माऊंट लिट्रा नावाची ही शाळा आहे. या विद्यार्थ्याचे वडील भरत नंदावत यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ही तक्रार केली आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की, त्यांचा 14 वर्षांचा मुलगा सम्यक नंदावत हा माऊंट लिट्रा शाळेत शिकतो. गुरुवारी त्याचे हिंदीचे शिक्षक कमलेश वैषणव हे वर्गात प्रश्न विचारीत होते. शिक्षकांनी दुसऱ्या एका मुलाला प्रश्न विचारला होता, मात्र सम्यक याने अनावधनाने त्या प्रश्नाचे उत्तर दिले. त्यामुळे शिक्षकांना एवढा राग आला की, त्यांनी सम्यकचे डोके टेबलावर आपटले. यात सम्यकचे समोरचे दात तुटले आहेत. मुलाने घरी आल्यानंतर हा सगळा प्रकार आई वडिलांना सांगितला.

हे सुद्धा वाचा

शिक्षकाची चूक असेल तर करणार निलंबित

याबाबत शाळेच्या व्यवस्थापकांची वेगळीच भूमिका आहे. त्यांनी सांगितले आहे की, ही एक दुर्घटना आहे. हा मुलगा घाबरुन बसत असताना त्याचे डोके टेबलावर आपटले. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीसीटीव्ही तपासणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. जर त्यात शिक्षकाची चूक असेल तर त्याला निलंबित करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.