मोठी बातमी! भारत बांगलादेश बॉर्डरवर तणाव, रातोरात 40 जण बेपत्ता, थेट बीएसएफने..

भारत आणि बांगलादेश सीमेवर मोठा तणाव बघायला मिळत आहे. त्यामध्येच बॉर्डरवर धक्कादायक घटना घडली. दोन्ही सैन्य अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. तणाव कमी व्हायचे तर वाढत आहे. बांगलादेशी नागरिकांविरोधात भारतात मोठी कारवाई सुरू आहे.

मोठी बातमी! भारत बांगलादेश बॉर्डरवर तणाव, रातोरात 40 जण बेपत्ता, थेट बीएसएफने..
India Bangladesh border
| Updated on: Jun 07, 2026 | 8:38 AM

भारत आणि बांगलादेश यांच्यात गेल्या काही दिवसांपासून तणाव बघायला मिळत आहे. बांगलादेश गंगा नदीचा करार पूर्ण होण्यापूर्वीच पाकिस्तान आणि चीनचा हात पकडताना दिसत आहे. त्यामध्येच पुन्हा एकदा भारत आणि बांगलादेश यांच्यातील अवैध स्थलांतरितांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पश्चिम बंगालमधील भारत आणि बांगलादेश सीमेवर सीमा सुरक्षा दल आणि बॉर्डर गार्ड बांगलादेश यांच्यात अनेक ठिकाणी तणाव दिसत आहे. भारताने बांगलादेश बॉर्डरवर सुरक्षा अधिक मजबूत केली. त्यामध्येच हा तणाव बॉर्डरवर असताना आता अजून एक धक्कादायक बातमी पुढे येत आहे. ज्याने भारतात मोठी खळबळ उडाली. सीमेवर रात्री झिरो पॉईंट येथे अडकलेले तब्बल 40 बांगलादेशी नागरिक अचानक बेपत्ता झाले. हे लोक अचानक बेपत्ता झाल्याने तणाव अधिकच वाढला.

कूचबिहार जिल्ह्यातील मेखलीगंज भागातील पानिशाला परिसरात पिलर क्रमांक 134 जवळ सर्वाधिक तणाव दिसून आला. सीमेवरील झिरो पॉईंटवर दहा जण अडकले होते. भारताने त्यांना बेकायदेशीरपणे परत पाठवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा बांगलादेशने केला. बीजीबीने त्यांना स्वीकारण्यास नकार दिला. भारतानेही त्यांना परत पाठवले.

बीएसएफने हा प्रश्न सोडवण्यासाठी ध्वज बैठकीचा प्रस्ताव दिला, पण त्यालाही बांगलादेशने नकार दिला. शनिवारी पहाटे तणावानंतर जोरदार शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर जवान बांगलादेशी हद्दीत परतले. कूचबिहारमधील, शितलकुची, जलपाईगुडी आणि दिनहाटा येथे तणाव बघायला मिळाला. या भागात महिला आणि मुलांसह 30 बांगलादेशी सीमेवर अडकले होते.

शुक्रवारी रात्रीपर्यंत हे लोक सीमेवरच अडकून पडली होती. मात्र, शनिवारी सकाळी हे सर्वजण अचानक बेपत्ता झाले. एकून 40 जण अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली. अखेर हे 40 जण बांगलादेशात गेले की, परत भारतात आले, याबाबत चर्चा सुरू आहे. बांगलादेश त्यांना घेण्यास नकार देत होता. ज्यामुळे आता सीमेवर पुन्हा एकदा तणाव बघायला मिळत आहे. आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये अवैध बांगलादेशी नागरिकांविरोधात जोरदार कारवाई सुरू आहे. बांगलादेशी नाहरिकांना त्यांच्या देशात पाठवले जात आहे.

Follow Us