AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! आम्ही 26 जुलैला जंतर-मंतरवरील आंदोलकांना चोपणार, हिंदुत्ववादी संघटनेची घोषणा

Cockroach Janata Party : कॉकरोच जनता पार्टीच्या समर्थकांना एका हिंदुत्ववादी संघटनेने मारहाण करण्याची धमकी दिली आहे. 26 जुलै रोजी दुपारी 12 वाजता जंतर-मंतरवरील CJP समर्थकांना मारहाण करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

मोठी बातमी! आम्ही 26 जुलैला जंतर-मंतरवरील आंदोलकांना चोपणार, हिंदुत्ववादी संघटनेची घोषणा
hindu raksha dal threat to Cockroach Janata PartyImage Credit source: Google
| Updated on: Jul 24, 2026 | 11:10 PM
Share

अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली कॉकरोच जनता पार्टी गेल्या एक महिन्यापेक्षा जास्त काळापासून आंदोलन करत आहे. नीट पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. अशातच आता कॉकरोच जनता पार्टीच्या समर्थकांना एका हिंदुत्ववादी संघटनेने मारहाण करण्याची धमकी दिली आहे. गाझियाबादमध्ये हिंदू रक्षा दल नावाची संघटना चालवणारे पिंकी चौधरी यांनी 26 जुलै रोजी दुपारी 12 वाजता जंतर-मंतरवरील CJP समर्थकांना मारहाण करण्याची घोषणा केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पिंकी चौधरी हे नेहमीच वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. आता चौधरी यांनी सीजेपीच्या आंदोलकांवर भारताची बदनामी करणे, सनातन धर्म आणि भारतीय सैन्याविरोधात वक्तव्य करणे तसेच अश्लीलता पसरवणे असे आरोप केले आहेत. यासोबत त्यांनी 26 जुलै रोजी दुपारी 12 वाजता आंदोलनस्थळी जाऊन आंदोलकांना चोपण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे आता 26 तारखेला दिल्लीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

व्हिडिओद्वारे धमकी

पिंकी चौधरी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून ही धमकी दिली. व्हिडिओमध्ये ते म्हणाले, ‘आपल्या देशाचे वातावरण बिघडवण्यासाठी जंतर-मंतरवर जमलेले लोक सनातनविरोधी आहेत. त्यांना असा एखादा मुद्दा हवा होता ज्याच्या माध्यमातून ते भारताची जगभर बदनामी करू शकतील. हा सनातन धर्मीयांचा देश आहे. तिथे काही मुली ज्या प्रकारची अश्लीलता पसरवत आहेत आणि ज्या भाषेचा वापर करत आहेत, ते चुकीचे आहे. आपल्या देशाच्या सैन्याविषयीही अत्यंत चुकीची वक्तव्ये करण्यात आली आहेत.’

खासदारालाही धमकी

पिंकी चौधरी यांनी पुढे म्हटले की, ‘जंतर-मंतरवरील आंदोलनात शरजील इमाम, उमर खालिद यांसारखे देशविरोधी विचारांचे लोक सहभागी आहेत. चौधरी यांनी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या समाजवादी पक्ष, काँग्रेस आणि आझाद समाज पक्षाचे नेते व खासदार चंद्रशेखर आझाद यांचाही उल्लेख करत त्यांनाही अप्रत्यक्ष धमकी दिली. चौधरी म्हणाले की, ‘चंद्रशेखर रावण स्वतःला मोठे समजत आहेत. त्यांचीही अक्कल ठिकाणावर आणण्याचे काम करू. भारताची जगात बदनामी होऊ देणार नाही. आम्ही पूर्ण ताकदीने त्यांचा विरोध करू.’

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच