train accident : मोठी बातमी! भीषण रेल्वे अपघात, 11 डबे रुळावरून घसरले

ओडिशामध्ये भीषण रेल्वे अपघात झाला आहे, बंगळुरूहून गुवाहाटीला जाणारी कामाख्या एक्स्प्रेस (12251) चे 11 डबे रूळावरून घसरले आहेत.

train accident : मोठी बातमी! भीषण रेल्वे अपघात, 11 डबे रुळावरून घसरले
Image Credit source: ANI
| Updated on: Mar 30, 2025 | 5:22 PM

ओडिशामध्ये भीषण रेल्वे अपघात झाला आहे, बंगळुरूहून गुवाहाटीला जाणारी कामाख्या एक्स्प्रेस (12251) चे 11 डबे रुळावरून घसरले. हा अपघात दुपारी बारा वाजेच्या आसपास झाल्याची माहिती समोर येत आहे. रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार ही घटना कटक परिसरामध्ये नेरगुंडी रेल्वे स्टेशनाच्या जवळ घडली आहे. सुदैवानं या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. घटनास्थळी जाऊन त्यांनी अपघाताची माहिती घेतली.

सर्व प्रवाशी सुरक्षीत

ओडिशामध्ये भीषण रेल्वे अपघात झाला आहे, बंगळुरूहून गुवाहाटीला जाणारी कामाख्या एक्स्प्रेसचे 11 डब्बे रुळावरून घसरले. या अपघाताबाबत माहिती देताना ईस्ट कोस्ट रेल्वेचे सीपीआरओ अशोक कुमार मिश्रा यांनी सांगितलं की, नेरगुंडी रेल्वे स्टेशनाच्या जवळ कामाख्या एक्स्प्रेसचा अपघात झाला आहे. रेल्वेचे आकरा डबे रुळावरून घसरले. मात्र या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, सर्व प्रवाशी सुरक्षीत आहेत. घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे. आपघातस्थळी तातडीची वैद्यकीय मदत देखील पोहोचवण्यात आली आहे. या अपघाताचं नेमकं कारण अस्पष्ट आहे. मात्र अपघाताच्या कारणांबाबत माहिती घेतली जात आहे, असं मिश्रा यांनी म्हटलं आहे.

 

अपघातामुळे काही ट्रेनच्या मार्गांमध्ये बदल 

दरम्यान कामाख्या एक्स्प्रेसचा अपघात झाला आहे. आकरा डबे रुळावरून घसरले, या अपघातामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी देखील रेल्वे वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झाला आहे. अपघातामुळे काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.

12822 (BRAG)
12875 (BBS)
22606 (RTN)

या रेल्वेच्या मार्गांमध्ये बदल करण्यात आला आहे. ओडिशामध्ये यापूर्वी देखील काही अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत, आज पुन्हा एकदा रेल्वेचा अपघात झाला आहे.