
दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात 10 नोव्हेंबरच्या सायंकाळी मोठा स्फोट झाला. या स्फोटात 9 जणांचा जीव गेला तर 20 पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले. i-20 कारमध्ये या स्फोट झाला. थेट जम्मू काश्मीरच्या पुलवामापर्यंत या स्फोटाचे कनेक्शन जाऊन पोहोचले. हा स्फोट घाई घाईत झालेला स्फोट असून खरा कट तर वेगळाच होता तपासात स्पष्ट झाले. हैराण करणारी बाब म्हणजे कटाची योजना आखणारे जवळपास सर्व डॉक्टर. आता दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाबद्दल एक अत्यंत मोठी अपडेट पुढे येताना दिसतंय. बुधवारी रात्री उशिरा पोलिस आणि फॉरेन्सिक टीमने पुष्टी केली आहे की, स्फोटकांनी भरलेल्या ह्युंदाई i-20 कारमध्ये उपस्थित असलेली व्यक्ती दुसरी कोणी नसून दहशतवादी डॉक्टर उमर नबी ऊर्फ उमर मोहम्मद हाच होता.
गाडीच्या ढिगाऱ्यातून सापडलेल्या मृतदेहाच्या डीएनए चाचणीत उमरच्या कुटुंबातील सदस्स्यांचे नमुनने 100 टक्के जुळली आहेत. यामुळे आता हे स्पष्ट झाले की, दहशतवादी उमर हाच स्फोटके भरलेली गाडी चालवत होता. अनेक सीसीटीव्हींमध्येही उमर दिसत होता. मात्र, त्याने तोंडाला मास्क लावल्याने त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. आता डीएनए चाचणीतून स्पष्ट झाले की, गाडीच्या ढिगाऱ्यात सापडलेला मृतदेह हा उमरचाच आहे.
सुरूवातीपासूनच्या तपासात उमर हाच टार्गेटवर होता. कारण उमरने स्फोटाच्या 11 दिवस अगोदरच ही कार खरेदी केली होती. उमर हा फरिदाबादच्या व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूलचा एक प्रमुख सदस्य होता आणि तो फरार होता. पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर तो सतत आपली ठिकाणे बदल होता. डॉ. उमर हाच कारमध्ये असल्याचे आता स्पष्ट झालंय. उमरच्या आई आणि भावाने डीएनए नमुने दिले होते, जे स्फोटात वापरल्या गेलेल्या कारच्या ढिगाऱ्यात सापडलेल्या हाडे, दात यांच्याशी 100 टक्के जुळले.
सुरक्षा यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, उमरने घाईगडबडीत आणि भीतीने कारसोबत स्वत:ला उडवून दिले. उमर कट्टरपंथी असल्याचे कुटुंबाला आधीच माहित होते. मात्र, त्यांनी याबद्दलची माहिती सुरक्षा यंत्रणांना माहिती दिली नाही. उमर हा तुर्कीतील अंकारा येथील हॅंडलरसोबत एका अॅपच्या मदतीने संपर्कात होता. 2022 मध्ये काही लोक भारतातून अंकाराला गेले होते. तिथेच त्यांची माथी भडकवण्यात आली.