
दिल्लीः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, सुधांशू त्रिवेदी, संजय गायकवाड, प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली होती. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक असा जोरदार सामना रंगला होता. हा वाद चालू असतानाच सीमावादाने डोकं वर काढल्याने दोन्ही राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
त्यामुळे महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार विरुद्ध ठाकरे गट असा वाद उफाळून आला आहे. त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भेट दिली नसल्यामुळेही ठाकरे गटाने राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
त्यावर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जळजळीत टीका करत छत्रपती शिवाजी महाराज आणि सीमावादावर गृहमंत्र्यांनी भेट नाकारल्यामुळे हे दुर्देवी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी राज्यातील राजकारण आणि गुजरात निवडणुकीच्या निकालाविषयीही आपले मत व्यक्त केले आहे. गुजरातमध्ये भाजपची सत्ता आली असली तरी त्याचा कोणताही परिणाम राज्याच्या राजकारणावर होणार नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी त्यांनी राज्याच्या राजकारणावर भाष्य करताना म्हणाले की, राज्यात जे फोडाफोडीचं राजकारण झालं आहे त्याला जनता उत्तर देईल असा इशारा त्यांनी शिंदे-फडणवीस गटाला दिला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांनी ज्या प्रमाणे राज्यात फोडाफोडीचे राजकारण केले आहे. आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांना पदावरून पाय उतार करणे हे येथील लोकांना आवडलेलं नाही असंही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील राजकीय व्यक्तिंकडकून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल सातत्याने बेताल आणि वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. त्यामुळे अशा राजकीय व्यक्तिंवर कारवाई करावी.
त्याचबरोबर राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची राज्यातून हकालपट्टी करावी ठाकरे गटाची मागणी आहे. त्यावर संसदेत आवाज उठवण्यात आला मात्र त्याविषयावर आम्हााल बोलू दिलं नाही असा ठपका त्यांनी भाजपवर आणि केंद्र सरकारवर ठेवला आहे. त्यामुळे या वादावर सर्वोच्च सभागृहात चर्चा होणं अपेक्षित आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सीमावादावरही आवाज उठवत त्यांनी केंद्राची काय भूमिका आहे. या गोष्टीही त्यांनी स्पष्ट केल्या. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर आम्ही अमित शहा यांच्या भेटीची वेळ मागितली होती, मात्र ते भेटले नाहीत आणि हे दुर्देवी असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.