मोठी बातमी! थलपती विजय यांचं सरकार धोक्यात? तामिळनाडूच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?

अन्नाद्रमुकचे नेते आणि महासचिव पलानीस्वामी यांनी मोठं भाकीत केलं आहे. तामिळनाडूमधील थलपती विजय यांचं सरकार धोक्यात असून, ते कधीही कोसळू शकतं असा दावा त्यांनी केला आहे.

मोठी बातमी! थलपती विजय यांचं सरकार धोक्यात? तामिळनाडूच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?
Thalapathy vijay
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 21, 2026 | 9:56 PM

तामिळनाडूमध्ये थलपती विजय यांच्या टीव्हीकेला विधानसभा निवडणुकीमध्ये मोठं यश मिळालं होतं. राजकारणात नवा पक्ष असताना देखील तामिळनाडूच्या मतदारांनी थलपती विजय यांच्यावर विश्वास दाखवला आणि तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये थलपती विजय यांच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीमध्ये जरी थलपती विजय यांचा पक्ष सर्वात मोठा ठरला असला तरी देखील त्यांना पूर्ण बहुमत मिळालं नव्हतं. थलपती विजय यांनी शेवटी काँग्रेससोबत युती करून तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापन केली. त्यांनी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घतेली. परंतु आता विजय थलपती यांच्या सरकारबाबत विविध दावे केले जात आहेत. तामिळनाडूमध्ये टीव्हीकेचं सरकार धोक्यात आहे, ते कधीही कोसळू शकतं असा एक दावा देखील करण्यात येत आहे.

दरम्यान याच संदर्भात आता अन्नाद्रमुकचे नेते आणि महासचिव पलानीस्वामी यांनी मोठं भाकीत केलं आहे. तामिळनाडूमध्ये सध्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. तसेच इतरही अनेक समस्या आहेत. या सर्व कारणांमुळे तामिळनाडूमधील टीव्हीकेचं सरकार कधीही कोसळू शकतं, असं भाकीत पलानीस्वामी यांनी केलं आहे. दरम्यान अन्नद्रमुकच्या वतीने टीव्हीके सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी केली जात आहे, अशी चर्चा सुरू आहे. याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता, यावर उत्तर देताना त्यांनी म्हटलं की, या सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची काहीही गरज नाही, हे सरकार कधीही कोसळू शकतं, कारण तामिळनाडूमध्ये सध्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे, राज्यात इतरही अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, असं पलानीस्वामी यांनी म्हटलं आहे.

Loading...

आमच्याकडे सध्या विधानसभेमध्ये पुरेस संख्याबळ नाहीये, त्यामुळे आम्ही टीव्हीकेचं सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहोत, हे फक्त मीडियामधून बातम्या पसरवल्या जात आहेत. मात्र तामिळनाडूमध्ये महागाई गगनाला भिडली आहे, कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. उद्योग-धंदे इतर राज्यांमध्ये जात आहेत, या सर्व कारणांमुळे हे सरकार कोसळू शकतं, असं भाकीत त्यांनी वर्तवलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us