Baramati News: दुपारी खंडणीसाठी कॉल, संध्याकाळी उद्योजकाच्या गाडीवर गोळीबार, बारामतीत खळबळ
बारामतीमधील शिवशंभो नगर परिसरात राहणारे उद्योजक राजन कोळेकर यांच्या घराजवळ येऊन अज्ञात हल्लेखोरांनी दोन राऊंड फायर केले. सुदैवाने या गोळीबारामध्ये कोणीही जखमी झाले नसल्याचे समोर आले आहे. या गोळीबाराच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

विक्रम वरे प्रतिनिधी: बारामतीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बारामती एमआयडीसी परिसरात गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बारामतीमधील शिवशंभो नगर परिसरात राहणारे उद्योजक राजन कोळेकर यांच्या घराजवळ येऊन अज्ञात हल्लेखोरांनी दोन राऊंड फायर केले. सुदैवाने या गोळीबारामध्ये कोणीही जखमी झाले नसल्याचे समोर आले आहे. या गोळीबाराच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
बारामतीत गोळीबार… उद्योजकाच्या गाडीवर फायरिंग!
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बारामती एमआयडीसी भागातील शिवशंभो नगर परिसरात गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. या परिसरात उद्योजक राजन कोळेकर यांचे निवासस्थान आहे. त्यांच्या घराजवळ येऊन अज्ञातांनी हा गोळीबार केला. हल्लेखोरांनी राजन कोळेकर यांच्या डिफेंडर गाडीला लक्ष्य करत दोन गोळ्या झाडल्या. राजन कोळेकर यांच्या पार्किंगमध्ये ही कार उभी होती. या गोळीराजाच्या आवाजाने परिसरात एकच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले.
आधी कॉल, मग गोळीबार..!
धक्कादायक बाब म्हणजे आज दुपारीच राजन कोळी यांना बारामती तालुक्यातील बीके कंपनीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून राजन कोळेकर यांना कॉल आला होता. यावेळी राजन कोळेकर यांच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली होती. या कॉलला राजन कोळेकर यांनी प्रतिसाद दिलानाही. त्यानंतर सायंकाळी त्यांच्या बंगल्याचे गेट उघडून गोळीबार करण्यात आला.
संबंधितांना धमकावण्याच्या उद्देशाने हा गोळीबार केल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. याबाबत राजन कोळेकर यांच्या तक्रारीनुसार फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. तसेच हल्लेखोरांच्या शोधासाठी विविध पाच पथके रवाना करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
