Vidya Malvade : इम्तियाज अलींनी माझा पाय पडकून ठेवला अन्…प्रसिद्ध अभिनेत्रीनं सांगितला इंटिमेट सीन शूट करण्याचा अनुभव
Actress On Intimate Scene : प्रसिद्ध अभिनेत्रीनं नुकत्याच एका मुलाखतीत इंटिमेट सीन शूट करण्याचा अनुभव सांगितला आहे.

‘चक दे इंडिया’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारी अभिनेत्री विद्या माळवदे सध्या एका जुन्या अनुभवामुळे चर्चेत आली आहे. 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डॉ. अरोरा’ या वेब सीरिजमध्ये तिनं अभिनेता कुमुद मिश्रा यांच्यासोबत काम केलं होतं. या सीरिजमधील दोघांचा एक इंटिमेट सीन विशेष चर्चेत आला होता. मात्र, हा सीन शूट करण्यापूर्वी विद्या प्रचंड घाबरली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं या सीनच्या शूटिंगदरम्यानचा अनुभव सांगितला आहे.
विद्या माळवदेनं सांगितला प्रसंग
विद्या माळवदे म्हणाली की, ‘सीरिजमध्ये एक इंटिमेट सीन होता. ज्यामुळे स्वत: कुमुद मिश्राही नर्वस होते. मी सुद्धा घाबरले होते. कारण, हा फक्त फिजिकल सीन नव्हता. तर तो इमोशनल सीनही होता. महिलेची भावनिक बाजू दाखवणारा तो सीन होता. मी हा सीन करु शकेन का? या विचारात होते. दोन्ही भावना मला बॅलन्स करता येतील का? असा प्रश्न पडला होता. कुमुदजीही पहिल्यांदाच इंटिमेट सीन करत होते त्यामुळे ते कठीण होतं. आम्ही ठरवलं की, हा सीन आधीच शूट करुन पटकन संपवूया. तो माझ्या शूटचा शेवटचा दिवस होता. त्या फिजिकल अॅक्ट वेळी इमोशन आणणं, मला कळतचं नव्हतं. कारण, तेव्हा वेगळी एनर्जी होती.’
View this post on Instagram
‘असे सीन्स करणं थोडं विचित्र असतं. पण यावेळी आपण हे सीन कोणासोबत करतोय ही गोष्टही महत्वाची असते. या सीनसाठी कुमुदजी उत्तम अभिनेते होते. आमच्यात जो कम्फर्टनेस होता तो खूप चांगला होता. तसंच असे सीन्स करताना निर्मातेही चांगले हवे. सीन शूट करण्याआधी इम्तियाज अली सर आमचे इंटिमसी कोच होते. कारण, आम्ही जेव्हा प्लॅन करत होतो. तेव्हा, सीन ब्लॉक करत होतो. तेव्हा आम्ही इम्तियाज अलींच्या घरी होतो. ते आमच्यासमोर बसले आणि त्यांनी माझा पाय पकडला. आधी मला वाटलं हे काय करतायेत, हे नक्की काय चाललंय? मी 20 सेकंद शांत राहिले. ते आमच्याशी बोलत होते. पण, त्यांनी माझा पाय पकडून ठेवला होता. आधीचे 10 सेकंद माझ्या डोक्यात खूप काही सुरु होतं. पण, नंतर मी शांत झाले. आम्ही पूर्ण सीन ब्लॉक केला.’ असं अभिनेत्रीनं शेवटी सांगितलं. ‘बॉलिवूड बबल‘ला दिलेल्या मुलाखतीत विद्या बोलत होती.
