थलपती विजय यांच्या विजयाचा या देशाला झाला भलताच आनंद; अख्ख्या देशात 3 दिवस दिवाळी, असा जल्लोष तर तामिळनाडूतही नाही
तामिळनाडूच्या राजकारणात आता नव्या नेत्याचा उदय झाला आहे. थलपती विजय यांनी विधानसभा निवडणुकीत भल्या -भल्या पक्षांचा पराभव करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. थलपती विजय यांचं हे यश आता देशाबाहेरपण साजरा केलं जात आहे .

यावेळी तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीत मोठा चमत्कार घडला आहे. तामिळनाडूच्या राजकारणात नव्या नेत्याचा उदय झाला आहे. हा नेता म्हणजे थलपती विजय आहे. जेमतेम एक वर्षापूर्वी टीव्हीके पक्षाची स्थापना करून राजकारणात एन्ट्री घेतली आणि त्यानंतर कोणाचा विश्वासही बसणार नाही असं यश आता थलपती विजय यांनी तामिळनाडूच्या विधानसभा निवडणूक निकालात मिळवलं आहे. टीव्हीकेने डीएमके आणि एआयएडीएमके सारख्या पक्षांना पराभवाची धूळ चारली आहे. टीव्हीकेला तामिळनाडूमध्ये तब्बल 108 जागा मिळाल्या आहेत. तामिळनाडूमध्ये बहुमतासाठी 118 जागांची आवश्यकता आहे. मात्र टीव्हीकेकडे सर्वात जास्त जागा असल्यामुळे आता थलपती विजय हे तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री असणार हे जवळपास निश्चित झालं आहे.
त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे टीव्हीकेनं बहुमतासाठी लागणारा आकडा जुळवला आहे. टीव्हीकेला काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला आहे, त्यामुळे त्यांच्याकडे यापूर्वीच 112 आमदार होते, त्यानंतर आता थलपती विजय यांना सीपीआय आणि सीपीएम पक्षाने देखील पाठिंबा जाहीर केला आहे, त्यामुळे टीव्हीकेचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान थलपती विजय यांच्या विजयाचा जेवढा आनंद तामिळनाडूमधील जनतेला झाला आहे. तेवढा किंवा त्याहीपेक्षा जास्त आनंद हा आणखी एका देशातील नागरिकांना झाला आहे. तामिळनाडूमध्ये टीव्हीकेला मिळालेल्या यशानंतर या देशात जोरदार सेलिब्रेशन सुरू आहे. त्या देशाचं नाव आहे, श्रीलंका. थलपती विजय यांना मिळालेल्या या यशाचं सध्या श्रीलंकेत जोरदार सेलिब्रेशन सुरू आहे. श्रीलंकेच्या अनेक राजकीय नेत्यांनी थलपती विजय यांना तामिळनाडूत मिळालेल्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीलंकेच्या माजी राष्ट्रपती कुमारतुंगा यांनी देखील थलपती विजय यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
तामिळनाडू आणि श्रीलंकेमध्ये नेहमची मैत्रीचे आणि सौहार्दपूर्ण संबंध राहिले आहेत. आपल्या कार्यकाळात देखील हे संबंध अशेच राहातील अशी अपेक्षा मी व्यक्त करते. आपल्याला पुढील वाटचालीसाठी सामर्थ्य आणि यश मिळावे अशा शुभेच्छा मी देते असं माजी राष्ट्रपती कुमारतुंगा यांनी म्हटलं आहे. दरम्यान तामिळनाडूत थलपती विजय यांना मिळालेल्या यशाची श्रीलंकन प्रसारमाध्यमांनी देखील मोठी दखल घेतल्याचं पहायला मिळत आहे. श्रीलंकन वृत्तपत्रांमध्ये विजय यांच्या विजयाची हेडलाईन बनवण्यात आली होती. तसेच सामान्य नागरिकांनी देखील या विजयाचा मोठा जल्लोष केला आहे.