AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, थलपती विजय यांनी गेम फिरवला, अखेर संख्याबळाचं गणित जुळलं

तामिळनाडूच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. अखेर तामिळनाडूमध्ये थलपती विजय यांचा सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. थलपती विजय यांना संख्याबळाचं गणित जुळवण्यात यश आलं आहे.

मोठी बातमी! तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, थलपती विजय यांनी गेम फिरवला, अखेर संख्याबळाचं गणित जुळलं
thalapathy vijayImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 08, 2026 | 4:11 PM
Share

तामिळनाडूच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, अखेर थलपती विजय यांच्या टीव्हीकेचा सरकार स्थापनेचा मार्ग मोकाळा झाला आहे. याबाबत आज सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन थलपती विजय हे घोषणा करण्याची शक्यता आहे. तामिळनाडून विधानसभा निवडणूक निकालामध्ये मोठा उलटफेर पहायला मिळाला होता. थलपती विजय यांनी एआयएडीएमके आणि डीएमके सारख्या प्रस्तापीत पक्षांना चांगलाच धक्का दिला. टीव्हीकेला तामिळनाडूच्या विधानसभा निवडणूकीत सर्वाधिक जागा मिळाल्या. टीव्हीकेचे उमेदवार तब्बल 108 जागांवर विजयी झाले. तर दुसरीकडे सत्ताधारी डीएमके आणि एआयएडीएमके पक्षाला या निवडणुकीत मोठा फटका बसला होता. खुद्द स्टॅलीन यांचा देखील पराभव झाला.

मात्र जरी थलपती विजय यांचा पक्ष तामिळनाडूमधील सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी देखील त्यांच्याकडे बहुमत मिळेल एवढा आकडा नव्हता. तामिळनाडूनमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी 118 जागांची आवश्यकता आहे, आणि टीव्हेकेला 108 जागा मिळाल्या होत्या. त्यांना बहुमतासाठी 10 जागांची आवश्यकता होती. त्यानंतर टीव्हीकेला काँग्रेसने पाठिंबा दिला, त्यामुळे थलपती विजय यांना 112 आमदारांचा पाठिंबा मिळाला. मात्र तरी देखील त्यांना आणखी 6 आमदारांची गरज होती.  याचदरम्यान थलपती विजय यांनी राज्यपालांकडे दोनदा जाऊन सत्ता स्थापनेचा दावा केला होता, परंतु राज्यपालांनी त्यांना 118 आमदारांच्या सह्याचं पत्र  सादर करण्यास सांगितलं होतं. मात्र त्यांच्याकडे प्रत्येक्षात 112 आमदारांच्याच सह्याचं पत्र होतं.

मात्र आता हा पेच सुटला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार थलपती विजय यांच्या टीव्हीकेला सीपीआय आणि सीपीएम पक्षांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे 118 आमदारांचा आकडा जुळवण्यात थलपती विजय यांना यश आलं आहे. आज सायंकाळी चार वाजता पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान यापूर्वी थलपती विजय यांनी एआयएडीएमकेकडे पाठिंब्यांची मागणी केली होती. मात्र त्यांनी थलपती विजय यांना पाठिंबा देण्यास नकार दिला होता. त्यामुळे थलपती विजय सर्वाधिक जागा मिळून देखील राज्यात सत्ता स्थापन करणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र आता थलपती विजय यांनी बहुमताचं गणित जुळवल्याची माहिती समोर येत आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?