ठाण्यातील हेरगिरी प्रकरणात नवा ट्विस्ट, हनीट्रॅपमधील पायल शर्मा आहे तरी कोण?

नेव्हल डॉकमध्ये ज्युनियर मेकॅनिकल इंजिनियर असलेला रवी वर्मा हनी ट्रॅपचा शिकार झाला होता.

ठाण्यातील हेरगिरी प्रकरणात नवा ट्विस्ट, हनीट्रॅपमधील पायल शर्मा आहे तरी कोण?
Honeytrap
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: May 30, 2025 | 2:51 PM

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानला चोख उत्तर दिले. तसेच भारतात सक्रिय असणारे पाकिस्तानी हेर शोधण्याची मोहीम हाती घेतली. यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हे प्रकरण ताजं असतानाच महाराष्ट्र एटीएसने ठाण्यातून रविकुमार वर्माला अटक केली. रवीला हनीट्रॅपच्या माध्यमातून अडकवण्यात आले. दरम्यान, त्याच्यासोबत पायल शर्मा या महिलेचे नाव चर्चेत आहे. आता ही पायल नेमकी आहे तरी कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

रविकुमार वर्मा हनीट्रॅपचा शिकार

एटीएसने अटक केलेला तरुण रविकुमार वर्मा हा नेव्हल डॉकमध्ये ज्युनियर मेकॅनिकल इंजिनियर आहे. त्याला पायल शर्माने हनी ट्रॅपमध्ये अडकवले होते. रवी वर्माने तब्बल १४ सबमरीन आणि युद्धनौकांची माहिती पाकिस्तानी अकाऊंट्सला पाठवली होती. युद्धनौका तसेच इतर जहाजाची माहिती आणि चित्रही बनवून पाकिस्तानला पाठवली. नेव्हल डॉकमधल्या परिसरात मोबाईल नेण्यास बंदी असल्याने आरोपी रवी वर्मा तिथल्या युद्धनौकांचे स्ट्रक्चर आणि इतर माहिती लक्षात ठेवायचा व त्यानंतर ती पाठवयचा. आरोपी रवी वर्मा ही माहिती ऑडियो आणि टेक्स्ट स्वरूपात तसेच चित्र काढून पाठवायचा असेही तपासात समोर आले आहे.

वाचा: ज्योती मल्होत्रा प्रकरणात मोठे वळण! वडिलांनी घेतला यूटर्न, म्हणाले…

कोण आहे पायल शर्मा

रविकुमारला हनीट्रॅपमध्ये पायल शर्माने अडकवले होते. ती पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्हचे फेसबुक अकाऊंट सांभाळत आहे. तिने रविकुमारला जाळ्यात अडकवून एका प्रोजेक्टसाठी युद्धनौकांची माहिती हवीय अशी मागणी फेसबुकच्या माध्यमातून केली होती. पायलसोबत इस्प्रीत असे आणखी एक फेसबुक अकाऊंट सापडले आहे. या अकाऊंटसोबत देखील रविकुमार वर्माचे बोलणे असायचे.

रवी वर्माचं मोडलं लग्न

यादरम्यान रवी वर्मा संदर्भात आणखी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. एटीएसने काल कारवाई करून रविकुमारला ताब्यात घेतल्यानंतर त्याचं ठरलेलं लग्न मोडलं आहे. काही दिवसांपूर्वीच त्याच्या आईने रविकुमारचं लग्न ठरवलं होतं. मात्र आता हेरगिरीच्या आरोपाखी एटीएसने त्याला अटक केल्यानंतर रविकुमारचं जिच्याशी लग्न ठरलं होतं, त्या कुटुबियांनी हे लग्न करण्यास नकार दिला आहे.