डोनाल्ड ट्रम्प पुन्हा तोंडावर आपटले; भारताबद्दल केलेल्या त्या सनसनाटी दाव्याची अमेरिकेकडूनच पोलखोल, ट्रम्प खोटं का बोलले?

डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा तोंडावर आपटले आहेत, अमेरिकन दूतावासाकडून त्यांच्या दाव्याची पोलखोल करण्यात आली आहे, त्यांनी भारताबाबत बोलताना मोठा दावा केला होता.

डोनाल्ड ट्रम्प पुन्हा तोंडावर आपटले; भारताबद्दल केलेल्या त्या सनसनाटी दाव्याची अमेरिकेकडूनच पोलखोल, ट्रम्प खोटं का बोलले?
| Updated on: Aug 22, 2025 | 4:34 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सध्या चांगलेच चर्चेमध्ये आहेत, त्यांनी नुकताच भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. आधी 25 टक्के टॅरिफची घोषणा करण्यात आली होती, त्यानंतर भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावण्यात आला. येत्या 28 ऑगस्टपासून भारतीय वस्तुंवर 50 टक्के टॅरिफ आकारला जाणार आहे.

दरम्यान याचदरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांचं खोटं पकडलं गेलं आहे. ट्रम्प यांच्याकडून असा दावा करण्यात आला होता की, भारतात वोटिंग वाढवण्यासाठी अमेरिकेनं 21 मिलियन डॉलरची मदत केली. भारत सरकारकडून तेव्हाच डोनाल्ड ट्रम्प यांचा हा दावा फेटाळून लावला होता, मात्र आता भारतातील अमेरिकेच्या दूतावासाकडून देखील ट्रम्प यांच्या या दाव्याची पोलखोल करण्यात आली आहे. अमेरिकेच्या दूतावासाकडून असं लेखी देण्यात आलं आहे की, 2014 मध्ये अमेरिकेकडून भारतासाठी असं कोणतंही फंडिंग करण्यात आलं नव्हतं.

अमेरिकन दुतावासानं काय म्हटलं?

डोनाल्ड ट्रम्प यांनी अलिकडेच मोठा दावा केला होता, भारतातील वोटर टर्नआउट वाढवण्यासाठी USAID च्या माध्यमातून अमेरिकेनं 21 मिलियन डॉल जवळ पास 175 कोटी रुपयांची फंडिंग केली. मात्र यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून लेखी उत्तर देण्यात आलं होतं, ज्यामध्ये ट्रम्प यांचा हा दावा फेटाळून लावण्यात आला होता. त्यानंतर आता अमेरिकेच्या भारतातील दूतावासाकडून यावर लेखी उत्तर देण्यात आलं आहे. अमेरिकेनं भारतामध्ये मतदान वाढवण्यासाठी असा कोणताही निधी दिला नाही, आणि गेल्या दशकभरात अमेरिकेकडून अशी कोणतीही मोहीम भारतामध्ये राबवली गेली नाही, असं अमेरिकेच्या दूतावासाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

खरी परिस्थिती काय?

भारतामध्ये निवडणुकीसंदर्भात जेवढे कँम्पेन राबवले जातात त्याचा सर्व खर्च निवडणूक आयोग करतो. त्यासाठी बाहेरून कोणतीही मदत येत नाही, असं सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे, त्यामुळे पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांची पोलखोल झाली आहे. त्यांचं खोटं पकडलं गेलं आहे.