उत्तर प्रदेश : नमकीन आणण्यासाठी गेली अल्पवयीन मुलगी घरी परतलीच नाही; दोन दिवसांनी नाल्यात सापडला मृतदेह

पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर मुलीला वाचवता आले असते, असा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी आमचे ऐकले नाही आणि आता तिचा मृतदेह नाल्यात पडलेला आढळून आला आहे. पोलीस आणि फॉरेन्सिक टीम तपासात गुंतली असून, सीसीटीव्ही फुटेजसह तांत्रिक मदत घेऊन प्रकरणाचा तपास सुरू आहे.

उत्तर प्रदेश : नमकीन आणण्यासाठी गेली अल्पवयीन मुलगी घरी परतलीच नाही; दोन दिवसांनी नाल्यात सापडला मृतदेह
crime
Follow us
| Updated on: Nov 13, 2021 | 8:57 PM

इटावा : खाऊ आणण्यासाठी घराबाहेर गेलेली अल्पवयीन मुलगी घरी परतलीच नाही. त्यानंतर दोन दिवसांनी मुलीचा मृतदेहच नाल्यात सापडल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील इटावा येथे घडली आहे. मुलीच्या गळ्यात नायलॉनची दोरी बांधली असल्याचे आढळून आले. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत. दरम्यान उत्तर प्रदेशात मुलींवरील अत्याचाराच्या घटना कमी होण्याचे दिसत नाही.

काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेशातील इटावा येथून एक 15 वर्षाची अल्पवयीन मुलगी बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास नमकीन आणण्यासाठी गेली होती. त्यानंतर ती घरी न परतल्याने तिच्या घरच्यांनी तिचा खूप शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र ती कुठेच सापडली नाही. त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. मात्र दोन दिवसांनी मुलीचा मृतदेह नाल्यात पडलेला आढळून आला.

नाल्यात अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला

पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर मुलीला वाचवता आले असते, असा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी आमचे ऐकले नाही आणि आता तिचा मृतदेह नाल्यात पडलेला आढळून आला आहे. पोलीस आणि फॉरेन्सिक टीम तपासात गुंतली असून, सीसीटीव्ही फुटेजसह तांत्रिक मदत घेऊन प्रकरणाचा तपास सुरू आहे. एसएसपी जय प्रकाश सिंह के यांनी सांगितले की, बुधवार, 10 नोव्हेंबर रोजी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवारी मुलीचा मृतदेह नाल्यात पडलेला आढळून आला. मृतदेहाच्या गळ्यात नायलॉनची दोरी बांधलेली आढळली, त्याचा तपास सुरू असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

पोलिसांनी वेळीच लक्ष न दिल्याचा मुलीचा आईचा आरोप

मृत मुलीच्या आईने सांगितले की, तिची मुलगी केवळ 15 वर्षांची होती आणि ती नववीत शिकत होती. बुधवारी दुपारी एक वाजता ती नमकीन घेण्यासाठी दुकानात गेली होती, तेव्हापासून ती परतली नाही. त्याच दिवशी संध्याकाळी पोलिसांना माहिती देण्यात आली, तरीही कोणी आले नाही. गुरुवारीही पोलिसांकडे गेले, तरीही पोलिस आले नाहीत.

घरातील मोबाईलवरही काही अनोळखी कॉल येत असल्याचे मुलीच्या वडिलांनी सांगितले. ते आपले नाव सांगत नव्हते. ते सर्व क्रमांक पोलिसांना दिले आहेत. आम्ही पोलिसांना रस्त्यात बसवलेले सीसीटीव्ही तपासण्यासही सांगितले, पण पोलिसांनी काहीच केले नाही. त्यानंतर आमच्या मुलीचा मृतदेह नाल्यात पडल्याची बातमी आली, आम्ही ओळख पटवली, मुलगी बेपत्ता झाल्यापासून अनोळखी फोन येऊ लागले.

पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु

नातेवाइकांनी काही लोकांची नावे सांगितली असून, त्यांच्यावरही कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच हत्येबाबत अधिक माहिती समजेल. (The body of a missing minor girl was found in Uttar Pradesh)

इतर बातम्या

पाकिस्तानात महिला पोलिसाचे घृणास्पद कृत्य, महिला कैद्याला नग्न नाचवले

धक्कादायक! बीडमध्ये अल्पवयीन विवाहितेवर सहा महिन्यात 400 जणांकडून बलात्कार, पीडिता 20 आठवड्यांची गरोदर

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.