धक्कादायक! बीडमध्ये अल्पवयीन विवाहितेवर सहा महिन्यात 400 जणांकडून बलात्कार, पीडिता 20 आठवड्यांची गरोदर

धक्कादायक! बीडमध्ये अल्पवयीन विवाहितेवर सहा महिन्यात 400 जणांकडून बलात्कार, पीडिता 20 आठवड्यांची गरोदर
प्रातिनिधिक फोटो

आईच्या निधनानंतर वडिलांनी मुलीचे लग्न लावून दिले. लग्नानंतर एक-दीड वर्ष मुलगी सासरी राहिली. मात्र त्यानंतर सासरकडून वारंवार छळ होत असल्याने मुलगी माहेरी परतली. माहेरी आल्यानंतर काही दिवसांनी मुलीने नोकरीसाठी आंबेजोगाई शहर गाठले.

महेंद्रकुमार मुधोळकर

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Nov 13, 2021 | 8:30 PM

बीड : नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन विवाहितेवर सहा महिन्यांत 400 हून अधिक जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बीडमधील आंबेजोगाईमध्ये घडली आहे. या घटनेनंतर पीडिता दोन महिन्यांची गरोदर आहे. याप्रकरणी बाल कल्याण समिती पीडितेचा गर्भपात करण्याची प्रक्रिया करीत आहे. याप्रकरणी पिडीतेच्या तक्रारीवरुन नऊ जणांविरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलीच्या पित्यासह चार आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे. यापक्ररणाचा सखोल तपास पोलीस करीत असून अंबाजोगाई शहरातील सर्व लॉजिंगची तपासणी करणार असल्याचे पोलीस अधीक्षक आर राजा यांनी सांगितले.

नेमकं काय घडलं?

पीडित अल्पवयीन मुलीचे कुटुंब मजुर असून तिच्या आईचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले आहे. आईच्या निधनानंतर वडिलांनी मुलीचे लग्न लावून दिले. लग्नानंतर एक-दीड वर्ष मुलगी सासरी राहिली. मात्र त्यानंतर सासरकडून वारंवार छळ होत असल्याने मुलगी माहेरी परतली. माहेरी आल्यानंतर काही दिवसांनी मुलीने नोकरीसाठी आंबेजोगाई शहर गाठले. तिथे तिची अॅकॅडमीतील दोन व्यक्तींशी भेट झाली. त्यांनी नोकरी मिळवून देतो सांगून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर सहा महिने वारंवार वेगवेगळ्या 400 हून अधिक लोकांकडून तिच्यावर बलात्कार झाला. यातून पीडिता 20 आठवड्यांची गरोदर राहिली, अशी माहिती पीडितेने बाल कल्याण समितीकडे नोंदवलेल्या जबाबात म्हटले आहे.

पोलीस कर्मचाऱ्यावरही बलात्काराचा आरोप

पीडिता याआधी आंबेजोगाई शहर पोलीसात करण्याचा बलात्काराची तक्रार करण्यासाठी गेली होती. मात्र पोलिसांनी तिची तक्रार घेतली नाही. उलट त्यावेळी ड्युटीवर असलेल्या पोलिसानेच लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचे पीडितेने आपल्या जबाबात म्हटले आहे. पोलिसानेच बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आर राजा यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

गेल्या सहा महिन्यात 60 पोस्कोचे गुन्हे दाखल

बीड जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. बीड जिल्ह्यात गेल्या 6 महिन्यात 60 पोस्कोचे गुन्हे दाखल होत आहेत. आंबेजोगाईमधील प्रकार अत्यंत गंभीर असून अल्पवयीन मुलगी बालकल्याण समितीकडे आल्यानंतर आम्ही या प्रकरणाची चौकशी केली असता ती 20 आठवड्याची गर्भवती असल्याचे आढळले. तिच्यावर पाच ते सहा महिन्यांत पैशाचे, जेवणाचे आमिष दाखवून 400 वेळा अत्याचार करण्यात आला. यात एका पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे, हे धक्कादायक आहे. या प्रकरणात कारवाई सुरू आहे. मात्र सूज्ञ नागरिक म्हणून अशा घटना रोखण्यासाठी पुढे यावे असे आवाहन बाल कल्याण समिती अध्यक्ष डॉ. अभय वणवे यांनी केले आहे. (a minor married woman was raped by 400 people in last six months in beed)

इतर बातम्या

Pune cybar crime | पॅन क्रमांक मागत सायबर गुन्हेगाराने जेष्ठाला घातला ५ लाखाला गंडा

वडधामन्यात युवतीची आत्महत्या, घरीच ओढणीने घेतला गळफास

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें