AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धनुष्यबाण चिन्ह कुणाचा आज फैसला होणार? निवडणुक आयोग आज निर्णय देणार की निर्णय राखून ठेवणार? जाणून घ्या

सुप्रीम कोर्टात सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अद्याप झालेला नाही, त्यामुळे शिवसेना पक्ष कुणाचा आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाला याबाबतचा निर्णय देतांना निवडणूक आयोगाची मोठी कसोटी लागणार आहे.

धनुष्यबाण चिन्ह कुणाचा आज फैसला होणार? निवडणुक आयोग आज निर्णय देणार की निर्णय राखून ठेवणार? जाणून घ्या
Image Credit source: Google
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Jan 30, 2023 | 8:57 AM
Share

संदीप राजगोळकर, टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली : लेखी म्हणणं मांडण्याची मुदत आज संपल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोग आज निकाल देण्याची शक्यता आहे. शिवसेना फूटीनंतर राज्यात सत्तांतर झाले. त्यामध्ये शिवसेनेत दोन गट निर्माण झाले आहे. यामध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्याकडून शिवसेना पक्षासह चिन्हाची मागणी केली जात आहे. सुप्रीम कोर्टासह निवडणूक आयोगात दोन्ही गटाकडून म्हणणं मांडले जात आहे. संपूर्ण देशाचे लक्ष हे आजच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लागून आहे. निवडणूक आयोगासमोर आज दोन्ही गट लेखी म्हणणं मांडणार आहे. प्रत्यक्ष युक्तिवादानंतर निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. निवडणूक आयोगाकडे दोन्ही गटाच्या वकिलांनी आत्तापर्यंत केलेला युक्तिवाद बघता यामध्ये पक्षाचे नाव आणि चिन्हा गोठवलं गेलं आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार याबाबत संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागून अआहे.

सुप्रीम कोर्टात सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अद्याप झालेला नाही, त्यामुळे शिवसेना पक्ष कुणाचा आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाला याबाबतचा निर्णय देतांना निवडणूक आयोगाची मोठी कसोटी लागणार आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर सत्तांतर अवलंबून राहणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाचा निर्णय हा अतिशय महत्वाचा मानला जात असून निकाल राखून ठेवला जाण्याची शक्यता कायदेतज्ज्ञ व्यक्त करत आहे.

निवडणूक आयोगाच्या समोर शिंदे गट आणि ठाकरे गट यांनी केलेला युक्तिवाद बघता धनुष्यबाण चिन्ह कुणाला याबाबत स्पष्टता येत नाही. निवडणूक आयोगाकडून आत्तापर्यन्त तारीख पे तारीख सुरू आहे.

दोन्ही गटाकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांचे संख्याबळ बघता दोन्ही गटाने धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच मिळेल असा दावा केला आहे.

आजची सुनावणी बघता केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला निकाल ऐतिहासिक असणार आहे. शिंदे गटाकडून महेश जेठमलाणी तर ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल हे दोन्ही वकील बाजू मांडत आहे.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना