सेवा तीर्थमध्ये पहिलीच कॅबिनेट बैठक संपन्न, पीएम मोदी यांनी देशासाठी घेतले हे मोठे निर्णय

नवीन पीएमओ "सेवा तीर्थ" मध्ये नरेंद्र मोदी यांची पहिली कॅबिनेट बैठक संपन्न झाली, यात "सेवा संकल्प" ठराव मंजूर करण्यात आले. यात केरळचे नाव बदलून केरलम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सेवा तीर्थमध्ये पहिलीच कॅबिनेट बैठक संपन्न, पीएम मोदी यांनी देशासाठी घेतले हे मोठे निर्णय
PM MODI
| Updated on: Feb 24, 2026 | 7:22 PM

नवीन पीएमओ सेवा तिर्थमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली कॅबिनेट मिटींग झाली. यात सेवा संकल्पाचा प्रस्ताव मंजूर झाला. ‘केरळ’ राज्याचे नाव ‘केरलम’ करण्यास मंजूरी दिली गेली. श्रीनगर इंटीग्रेटेड एअरपोर्ट टर्मिनल प्रोजेक्टवरही मंजूरीची मोहर लावण्यात आली. सेवा तिर्थमध्ये झालेल्या पहिल्या बैठकी संदर्भात पीएम मोदी यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी लिहीलेय की आज युगाब्द 5127, विक्रम संवत 2082, फाल्गुन शुक्ल अष्टमीच्या दिवशी नवनिर्मित सेवा तिर्थमध्ये केंद्रीय कॅबिनेटची पहिली बैठक झाली, यात देशासाठी अनेक अभूतपूर्व निर्णय घेण्यात आले.

पीएम मोदी म्हणाले की कॅबिनेट हा संकल्प केला आहे की स्वदेशी विचार, आधुनिक स्वरुप आणि १४० कोटी देशवासियांच्या अनंत सामर्थ्याच्या पायावर सेवा तिर्थ राष्ट्र सेवेच्या कर्तव्य-यज्ञला निरंतर पुढे नेईल. या राष्ट्रयज्ञात आमचा मंत्र आहे – यद् भद्रं तन्न आ सुव. म्हणजे जे काही शुभ आणि कल्याणकारी आहे, जे नवे विचार आहेत, ते आम्हाला अनवरत प्राप्त होत राहतील.

एनडीए सरकारने अभूतपूर्व काम केले

याआधी बैठकीत घेतलेल्या निर्णयांच्या संदर्भात केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए 1, 2 आणि 3 मध्ये सरकारने अभूतपूर्व काम केले. आज कॅबिनेटने जे आवश्यक निर्णय घेतले आहेत. त्यातील पहिला केरळचे नाव केरलम करणे हा आहे. गोंदिया ते जबलपूर रेल्वे मार्गिकेचे दुपदरीकरण करणे, घमरिया ते झारखंडच्या चांडिलपर्यंत तिसरी आणि चौथी मार्गिका आणि श्रीनगरात एक नवीन इंटीग्रेटेड एअरपोर्ट टर्मिनल, अहमदाबाद मेट्रोचा विस्तार आणि कच्च्या ज्यूटचा एमएसपी.

पॉवर सेक्टरमध्ये मोठ्या सुधारणांना मंजूरी

ज्यूटचा एमएसपी वाढवून 5,925 रुपये प्रती क्विंटल करण्यात आला आहे. मोदी सरकारने नेहमीच एमएसपीला खर्चापेक्षा 50 टक्के जास्त ठेवले आहे. पीएम मोदी यांनी पॉवर सेक्टरमध्ये कॅबिनेटमध्ये एका मोठ्या सुधारणेला मंजूरी दिली आहे असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांत ग्रिडमध्ये केलेल्या गुंतवणूकीमुळे भारताचा ग्रिड जगभरातला सर्वात मजबूत ग्रिड मानला जातो.

नवीन इंटीग्रेटेड टर्मिनल बिल्डिंगला मंजूरी

कॅबिनेटने श्रीनगर एअरपोर्टच्या नव्या इंटीग्रेटेड टर्मिनल इमारतीला मंजूरी दिली आहे. सध्याचे टर्मिनल 20 हजार चौरस मीटर परिसरात पसरलेले आहे. नवीन टर्मिनल सुमारे 71 हजार चौरस मीटरमध्ये असेल. हा प्रकल्प येत्या चार वर्षात पूर्ण होईल. पुनारख-किऊल तिसरी आणि चौथी मार्गिकेचा प्रकल्प तीन वर्षांचा आहे. यासाठी खूप कमी जमीन अधिग्रहीत केली जाणार आहे. यात 14 अत्यावश्यक पुल, 18 मोठे पुल आणि 62 छोट्या पुलांचा समावेश असल्याचे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.