AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडिया 2026 च्या चौथ्या पर्वाची दिमाखात सुरुवात; 20ऑक्टोबरपर्यंत रंगणार सांस्कृतिक महोत्सव

दिल्लीच्या मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाच्या चौथ्या सिजनची सुरुवात शुक्रवारपासून होत आहे. 20 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात विविध रंगारंग कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडिया 2026 च्या चौथ्या पर्वाची दिमाखात सुरुवात; 20ऑक्टोबरपर्यंत रंगणार सांस्कृतिक महोत्सव
TV9 Network CEO & MD Barun Das and Whole-time Director Hemant Sharma
| Updated on: Oct 16, 2026 | 5:31 PM
Share

नवी दिल्ली : TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडिया २०२६ च्या चौथ्या पर्वाला आज, १६ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. २० ऑक्टोबरपर्यंत नवी दिल्लीतील इंडिया गेट परिसरातील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियममध्ये हा महोत्सव रंगणार आहे. पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवात भारताची समृद्ध संस्कृती, रुचकर खाद्यपदार्थ, कला, संगीत आणि विविध परंपरांचे दर्शन घडणार आहे. या निमित्ताने TV9 नेटवर्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि व्यवस्थापकीय संचालक (MD) बरुण दास यांनी हा भारताचा खरा उत्सव असल्याचे सांगितले.

ते म्हणाले, “हा भारताचा असा उत्सव आहे, जिथे देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात आणि एकत्र आनंद साजरा करतात. आपण याला दुर्गापूजा म्हणत असलो, तरी हा उत्सव अधिक सर्वसमावेशक बनवला आहे. येथे गरबा आहे, दक्षिण भारताच्या पारंपरिक संस्कृतीचे दर्शन आहे आणि देशभरातून आलेले स्टॉलधारकही आहेत. त्यामुळे हा भारताचा खऱ्या अर्थाने उत्सव आहे.”

‘गरबा आता राष्ट्रीय उत्सव बनला आहे’

TV9 फेस्टिव्हलमध्ये आयोजित विविध कार्यक्रमांविषयी बोलताना बरुण दास म्हणाले की, या महोत्सवाचा मुख्य केंद्रबिंदू दुर्गापूजा आहे. त्यामुळे उत्सवाची सुरुवात दुर्गापूजेने होते. त्यानंतर येथे येणाऱ्या प्रत्येकाला मनोरंजनाची संधी मिळावी आणि रात्री उशिरापर्यंत विविध कार्यक्रमांचा आनंद घेता यावा, याची काळजी घेतली जाते.

ते पुढे म्हणाले, “गरबा आता केवळ गुजराती उत्सव किंवा गुजराती नृत्य राहिलेले नाही, तर तो राष्ट्रीय उत्सव बनला आहे. मला वाटते की नवरात्रोत्सव, दुर्गापूजा आणि गरबा हे सर्व आता एकमेकांशी जोडले गेले आहेत.”

TV9 नेटवर्कचे पूर्णवेळ संचालक हेमंत शर्मा म्हणाले की, भारतातील सर्व प्रदेशांचे प्रतिनिधित्व करणारे TV9 हे एकमेव नेटवर्क आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यातून आणि संस्कारांतून भारताची विविधतेतील एकता दिसून येते. सर्व भाषांमध्ये आघाडीवर असलेल्या या नेटवर्कच्या माध्यमातून देशातील विविध संस्कृतींना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जातो.

दुर्गापूजेचे महत्त्व स्पष्ट करताना ते म्हणाले, “हा शक्तीची साधना करण्याचा उत्सव आहे. वर्षातून एकदा आपण शक्तीची उपासना करतो; परंतु ही शक्ती आपल्या प्रत्येकाच्या आत असते. या पाच दिवसांत आपण आपल्या अंतर्गत ऊर्जेला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून समाजकल्याणाची कामे करता येतील आणि जनतेची सेवा करता येईल.”

‘हा दिल्लीतील सर्वांत मोठा पूजा मंडप’

दुर्गापूजेच्या मंडपाविषयी बोलताना हेमंत शर्मा म्हणाले की, हा दिल्लीतील सर्वांत मोठा पूजा मंडप आहे. येथे भक्तीची पवित्रता, उत्सवाचे रंग आणि भारताच्या विविध संस्कृतींचे दर्शन एकाच ठिकाणी अनुभवता येणार आहे.

ते म्हणाले, “पश्चिम बंगालला न जाताही येथे संपूर्ण बंगाल अवतरल्याचा अनुभव मिळेल. गुजरातला न जाताही गुजरातमधील दांडिया आणि गरब्याचा आनंद घेता येईल. पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे अशा संपूर्ण भारताचे प्रतिनिधित्व या पूजा मंडपात दिसून येते. येथे केवळ सांस्कृतिक कार्यक्रमच नाहीत, तर विविध राज्यांतील उत्पादनांची विक्री करणारे स्टॉलही उपलब्ध आहेत.”

आज संध्याकाळी ७ वाजता हरदीप कौर यांची थेट मैफल

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी, १६ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध गायिका हरदीप कौर आपल्या सुरेल आणि भावपूर्ण आवाजाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण पगडीधारी शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या हरदीप कौर यांच्या थेट संगीत कार्यक्रमाला संध्याकाळी ७ वाजता सुरुवात होणार आहे.

१७ ऑक्टोबर रोजी दमदार रॅप आणि ऊर्जेने भरलेल्या संगीतासाठी प्रसिद्ध असलेला रफ्तार थेट संगीत कार्यक्रम सादर करणार आहे. त्याच्या सादरीकरणाची चाहत्यांना उत्सुकता आहे.

१८ ते २० ऑक्टोबरदरम्यान विविध कलाकारांची प्रस्तुती

१८ ऑक्टोबर :

संध्याकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत पंजाबी गायक बी.पी. सिंह यांचे सादरीकरण.

संध्याकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत संगीतकार श्रेयस धर्माधिकारी यांची मैफल. त्यांनी ‘हनुमान अंश’ या चित्रपटाच्या शीर्षकगीताला आवाज दिला आहे.

रात्री ८ ते १० वाजेपर्यंत DJ शिवल यांचा संगीत कार्यक्रम.

१९ ऑक्टोबर :

संध्याकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत निजामी बंधू यांचे सादरीकरण.

संध्याकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत सौरभ शौरी यांची प्रस्तुती.

रात्री ८ ते १० वाजेपर्यंत DJ वेरोनिका यांचा संगीत कार्यक्रम.

२० ऑक्टोबर :

संध्याकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत गायिका फलिता यांचे सादरीकरण.

संध्याकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत ‘महफिल-ए-खास’ हा संगीत कार्यक्रम.

रात्री ८ ते १० वाजेपर्यंत DJ नितीश गुलयानी यांची प्रस्तुती.

भारतीय संस्कृती, विविध राज्यांची खाद्यसंस्कृती, संगीत, नृत्य आणि परंपरा यांचा संगम घडवणारा TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडिया २०२६ हा महोत्सव राजधानी दिल्लीमध्ये सांस्कृतिक एकतेचा आणि उत्साहाचा अनोखा अनुभव देणार आहे.

Follow Us
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?