Rhino horns | या प्राण्याची शिंगं सोन्यापेक्षा मूल्यवान, जाणून घ्या का आहेत इतके महाग

| Updated on: May 23, 2021 | 7:55 PM

गेंड्याच्या शिंगामध्ये अशी तत्वं आढळतात, जी अत्यंत मौल्यवान आहेत आणि बर्‍याच औषधांमध्ये देखील याचा वापर करतात. ते काळ्या बाजारात विकले जातात, ज्यामुळे त्याची किंमत खूप जास्त आहे. (The horns of this animal are more valuable than gold, know why they are so expensive)

Rhino horns | या प्राण्याची शिंगं सोन्यापेक्षा मूल्यवान, जाणून घ्या का आहेत इतके महाग
या प्राण्याची शिंगं सोन्यापेक्षा मूल्यवान
Follow us on

नवी दिल्ली : सोने म्हटले की सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. विशेषतः महिला वर्गात याची लेकप्रियता अधिक आहे. कोरोना महामारीमुळे सोन्याचे भाव खूप वधारले आहेत. यामुळे विवाहोत्सुक लोकांचे बजेट बारगळले आहे. परंतु, अशा बर्‍याच गोष्टी आहेत ज्या सोन्यापेक्षा कित्येक पटीने मूल्यवान आहेत. यात एका प्राण्याच्या शिंगाचा देखील समावेश आहे, ज्याच्या एका शिंगाचे मूल्य लाखो रुपये आहे. होय, गेंडाचे एक शिंग सोन्यापेक्षाही खूपच महाग आहे आणि वजन करताना एक ग्रामचाही हिशेब केला जातो. गेंड्याच्या शिंगामध्ये असे काय असते, ज्यामुळे ते एवढे महाग असतात. तथापि, यामुळे गेंडाची शिकारही वाढत आहे आणि त्यासाठी सरकारने बरीच महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. (The horns of this animal are more valuable than gold, know why they are so expensive)

आपण बहुतेकदा ऐकले असेल की गेंडाच्या शिकारीत वाढ झाली आहे. ही शिकार फक्त त्यांच्या शिंगासाठी केली जाते. गेंड्याची शिंगे बाजारात खूप महाग आहेत आणि तेथे काळा बाजार आहे. वास्तविक, गेंड्याच्या शिंगामध्ये अशी तत्वं आढळतात, जी अत्यंत मौल्यवान आहेत आणि बर्‍याच औषधांमध्ये देखील याचा वापर करतात. ते काळ्या बाजारात विकले जातात, ज्यामुळे त्याची किंमत खूप जास्त आहे.

शिंगांमध्ये काय असते?

वास्तविक, गेंड्याच्या शिंगामध्ये केराटीन असते. या केराटिनची किंमत सोन्यापेक्षा खूप जास्त आहे. या केराटिनमुळेच गेंडाची शिंगे महागड्या किंमतीत विकली जातात आणि त्यासाठी अनेक गेंड्यांची शिकार केली जाते. त्याला चीनमध्ये जादूचे औषध म्हणतात. तथापि, आता ही शिकार रोखण्यासाठी जगभरात अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. अशा परिस्थितीत, गेंड्याच्या शिंगाचा व्यवसाय कायदेशीर करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि त्याची किंमत ठरवली पाहिजे जेणेकरुन शिकार टाळता येईल.

तसे, शिंग कापल्याने गेंड्याला कोणतीही समस्या येत नाही. हे एखाद्या व्यक्तीचे केस किंवा नखे ​​तोडण्यासारखे आहे. यामुळे त्यांना त्रास होत नाही आणि एकदा शिंग कापला की तो परत येतो. या शिंगाच्या प्रत्येक ग्रॅमचे मूल्य अधिक असते आणि त्याचे वजन अचूक असते. गेंड्याच्या शिंगामध्ये सापडणारा केराटिन आशियामध्ये सोन्यापेक्षा अधिक किंमतीत विकले जाते.

किती आहे किंमत?

याच्या किंमतीबद्दल बोलले तर ते प्रति किलो 1 लाख डॉलर्सपर्यंत विकले जाते. म्हणजेच, भारताच्या अर्थव्यवस्थेनुसार, एका शिंगाची किंमत लाखो रुपये आहे. सन 2020 च्या एका अहवालानुसार गेल्या दहा वर्षात देशभरात एक शिंगवाल्या 102 गेंड्यांची शिकार केली गेली. गेल्या दोन वर्षांत 32 गेंडे शिकाऱ्यांनी मारले. सध्या केवळ तीन हजाराहून अधिक भारतीय गेंडे वन्य अवस्थेत जिवंत आहेत, त्यापैकी सुमारे 2000 केवळ आसाममध्ये आढळतात. (The horns of this animal are more valuable than gold, know why they are so expensive)

इतर बातम्या

सिमेंटच्या शोधाआधी ‘ताजमहल’मध्ये दगड कसे बसविले?; कारागिरीची माहिती वाचाल तर थक्क व्हाल!

5 लाख ते 5 कोटींपर्यंतचे कर्ज, तेही चुटकीसरशी! ‘या’ योजनेबद्दल जाणून घ्या…